एक्स्प्लोर
Advertisement
Palghar ZP Result | पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भाजपला मोठा दणका
मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता असली तरी यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषद महाविकासआघाडीच्या हाती राहणार असल्याची शक्यता आहे.
पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडली असून या निवडणुकीत शिवसेनेच वर्चस्व पाहायला मिळालं. ही निवडणूक जिल्हा परिषदेच्या 57 तर आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी झाली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 57 पैकी शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 15, भाजप 10, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 , बहुजन विकास आघाडी 4 , अपक्ष 3, तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. 57 जागांपैकी बहुमतासाठी 29 जागांची गरज असली तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडी सत्तेत येणार असल्याचे चित्र आहे. मागील वेळेस सेना-भाजप युती आणि बहुजन विकास आघाडी अशा तिघांकडे पालघर जिल्हा परिषदेची सत्ता असली तरी यावेळेस झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे पालघर जिल्हा परिषद महाविकासआघाडीच्या हाती राहणार असल्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपला मागे टाकण्यात शिवसेना राष्ट्रवादीला यश आलं आहे. जिल्हा परिषदेसह झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत मोखाडा आणि पालघर या पंचायत समित्या शिवसेनेकडे, तलासरी पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे, जव्हार पंचायत समिती भाजपाकडे, विक्रमगड पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उर्वरित डहाणू , वाडा आणि वसई यातीन पंचायत समित्यांवर महा विकास आघाडीला संमिश्र यश मिळालं आहे.
पालघर निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचार सभा घेतली होती तर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि आमदार रवींद्र चव्हाण ठाण मांडून होते. शिवसेनेकडूनही मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील ठाण मांडून बसले होते. राष्ट्रवादी आणि जिजाऊची पालघर विकास आघाडी एकत्र असल्याने सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनीही जिल्हा पिंजून काढला होता. एकूणच बघायला गेलं तर सर्वच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांमध्ये तलासरी तालुक्यात माकपाने सर्वाधिक 8 जागा मिळवीत एकाकी सत्ता मिळवली आहे. डहाणू तालुक्यात राष्ट्रवादीला सर्वाधिक 9 तर शिवसेना 9 आणि भाजपा 7 अशा जागा पटकाविल्या असून येथे राष्ट्रवादी भाजप एकत्र येण्याची चिन्ह आहेत. पालघर तालुक्यात शिवसेनेने नेहमीप्रमाणे सर्वाधिक 23 जागा मिळवीत आपली सत्ता कायम राखली आहे.
वसईमध्ये शिवसेना आणि बविआ यांना समान प्रत्येकी 3 जागा मिळाल्या असून भाजपा 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीने 4 जागा मिळवल्या असून पालघर विकास आघाडी बरोबर युती असल्याने त्यांचे बलाबल 6 झालं आहे.
जव्हारमध्ये मात्र भाजपला सर्वाधिक 4 जागा मिळाल्या आहेत. वाडा तालुक्यात ही महाविकास एकत्रित आली तर सत्ता स्थापन होऊ शकते. मोखाडामध्ये मात्र नेहमी प्रमाणे शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविली आहे.
पालघर जिल्हा परिषद निकाल :
एकूण जागा : 57
शिवसेना : 18
माकपा: 06
भाजप : 10
राष्ट्रवादी : 15
बविआ: 04
मनसे:0
अपक्ष : 03
काँग्रेस : 1
2015 ची निवडणुकीच्या तुलनेत भाजपची पीछेहाट
एकूण जागा : 57
2015 2020
शिवसेना : 15 18
माकपा: 05 05
भाजप : 21 12
राष्ट्रवादी : 04 14
बविआ: 10 04
काँग्रेस: 01 01
अपक्ष : 01 03पालघर जिल्ह्यतील आठ पंचायत समिती निकाल
पक्षीय बलाबल
1)तलासरी
माकपा 08
भाजप 02
----------------
10
2)डहाणू
शिवसेना 08
राष्ट्रवादी 09
भाजप 07
माकपा 02
-----------------–-
26
3)पालघर
शिवसेना 23
राष्ट्रवादी 02
मनसे 01
भाजप 02
बविआ 04
अपक्ष 02
-----------------------
34
4)वसई
शिवसेना 03
बविआ 03
भाजप 02
-------------------
08
5)विक्रमगड
राष्ट्रवादी 04
शिवसेना 01
भाजप 02
माकपा 01
अपक्ष 02
----------------------
10
6)जव्हार
भाजप 04
शिवसेना 03
माकपा 01
--------------------
08
7) वाडा
राष्ट्रवादी 04
शिवसेना 04
भाजपा 02
मनसे 01
अपक्ष 01
------- -------------
12
8)मोखाडा
शिवसेना 05
भाजपा 01
-------------------
06
एकूण 114
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement