एक्स्प्लोर

Nagpur ZP Electon Result : निवडणुकीत भाजपची धूळदाण, होमग्राऊंडवरच देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल नागपुरात लागला आहे. सत्ताधारी भाजपच्या हातून सत्ती खेचून आणण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

मुंबई : विधानसभेत नंबर एकचा पक्ष राहिल्यानंतर सत्ता राखण्यात भाजपला यश आलं नाही. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरला आणि भाजपला सत्तेपासून दूर राखण्याचा पण धरला. त्याचीच प्रचिती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत येत आहे. देवेंद्र फडणवीसांचं होमपिच असलेल्या नागपुरातच भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं. मात्र जिल्हा परिषदेच्या 58 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवण्यात यश आलं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत 58 पैकी काँग्रेस 30, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 15, शेकाप 1, अपक्ष 1 तर शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधानं मानावं लागणार आहे. एकूण जागा : 58 काँग्रेस - 30 राष्ट्रवादी काँग्रेस - 11 भाजप - 15 शिवसेना - 01 अपक्ष - 01 विधानसभेच्या निकालानंतर भाजपला राज्यात उतरती कळा लागली आहे. ज्या नागपुरात भाजप 2012 पासून जिल्हा परिषदेवर सत्तेत राहिली, त्याच नागपुरात आज भाजपला अवघ्या 12 जागांवर यश मिळालं आहे. आधीच जालना, बीड, औरंगाबाद, अमरावतीतून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला महाविकासआघाडीनं पराभवाची धूळ चारली होती. भाजपचे गड राहिलेल्या जालना, बीडमध्ये माघार घेण्याची नामुष्की ओढावली आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच होमपिचवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. Vijay Vadettiwar Bunglow | कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यात प्रवेशबंदी, बंगल्याची दारं-खिडक्या बंद | ABP Majha विधानसभेनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक केली. परिणामी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची धूळदाण उडाली आहे. महाविकासआघाडीला मिळणारं यश भाजपसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. त्यामुळे आता महापालिकेचं भलंमोठं आव्हान पेलण्यासाठी भाजपला कंबर कसावी लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही काँग्रेस उमेदवारानं विजय मिळवला आहे. त्यामुळे नागपुरातील भाजपच्या घसरगुंडीला बावनकुळे फॅक्टरला जबाबदार धरलं जात आहे. विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीनं सुरुंग लावला आहे. संबंधित बातम्या :  Nandurbar ZP Election | नंदुरबार जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती, काँग्रेस-भाजपला प्रत्येकी 23जागा, शिवसेनेच्या हाती सत्तेची चावी Akola ZP Election Result : अकोला जिल्हा परिषदेत वंचित सर्वात मोठा पक्ष, सत्ता वंचितकडे राहण्याची शक्यता Palghar ZP Result | पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भाजपला मोठा दणका

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget