एक्स्प्लोर

MBBS विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत संपवली जीवनयात्रा; घटनास्थळी सापडले दोन पानाचे पत्र

Yavatmal News : एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मात्र या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

यवतमाळ : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (Shri Vasantrao Naik Government Medical College Yavatmal) येथील एका एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव असून या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काल, 28 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  मृत विद्यार्थिनी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून आत्महत्यांचे कारण अद्याप कळू शकले नाही.  या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी दोन पानांचे पत्र

मृत विद्यार्थिनी सुहानी ढोले ही यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. मात्र तिने हे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा का संपवली, या बाबत अद्याप कुठलीही माहिती कळू शकलेली नाही. या प्रकरणाचा तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन पानाचे पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या पत्रात मृत विद्यार्थिनीने नेमके काय लिहले आहे, हे अद्याप कळू शकले नाही. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासन देखील या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नसल्याने या प्रकरणाचे कारण काळू शकले नाही.  यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.

आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल  

या प्रकरणी शहर पोलिसांकडून तपास सुरु असून आत्महत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही महिन्यांपूर्वी यांच कॉलज मधल्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालय दोन डॉक्टरांवर एका रुग्णाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकजण थोडक्यात बचावला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले होते. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या रुग्णाला अटक केली.  त्यामुळे आता पुन्हा एक शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली असून अनेक प्रश्न देखील या निमित्याने उपस्थित केले जात आहे. 

 

हे ही वाचा :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSaif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Embed widget