एक्स्प्लोर

Zombie Virus: कोरोनानंतर आणखी एका महामारीची भीती! रशियाच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा जिवंत केला 48,500 वर्षे जुना 'झोम्बी व्हायरस'

Zombie Virus : न्यूयॉर्क पोस्टच्या मते, हा व्हायरस पुन्हा जिवंत झाल्यानंतर आणखी एका साथीच्या रोगाची भीती आहे. असं फ्रेंच शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 

Zombie Virus : कोरोना महामारीने (Corona) अवघ्या जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले असतानाच आता आणखी एका महामारीची भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे. रशियातील एका तलावाखाली असलेल्या 48,500 वर्षे जुन्या 'झोम्बी व्हायरस'ला पुन्हा जिवंत केल्याचा दावा फ्रेंच शास्त्रज्ञांनी केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या मते, हा व्हायरस पुन्हा जिवंत झाल्यानंतर आणखी एका साथीच्या रोगाची भीती आहे. असं फ्रेंच शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. 

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी जीवनाला मोठा धोका

शास्त्रज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवी जीवनावर मोठा धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे हवामानातील बदलामुळे बर्फातील पर्माफ्रॉस्ट झपाट्याने वितळत आहेत. यामुळे अनेक जुने विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. रशियातील एका तलावाखाली 48,500 वर्षांहून अधिक काळ बर्फात गोठलेला झोम्बी व्हायरसही आता जिवंत झाल्याचा दावा केला जात आहे. हा विषाणू मानवांसाठी नवीन धोका निर्माण करू शकतो. न्यू यॉर्क पोस्टने व्हायरस अभ्यासाचा हवाला दिला, ज्यामध्ये असे म्हटलंय की, या प्राचीन विषाणूंचे अस्तित्व वनस्पती, प्राणी तसेच मानवी रोगांच्या बाबतीत अधिक धोकादायक असेल.


बर्फ वितळल्याने व्हायरस होतील जिवंत 
प्राथमिक अहवालानुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर गोलार्धाचा एक चतुर्थांश गोठलेली जमीन वितळत आहे. यामुळे लाखो वर्षांपासून त्याखालील गोठलेले सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात, माहितीनुसार त्याखाली अनेक घातक सूक्ष्मजंतू असतात. संशोधकांचे म्हणणे आहे की, वितळणाऱ्या बर्फाच्या या सेंद्रिय पदार्थाच्या भागामध्ये लपलेले सूक्ष्मजंतू तसेच वर्षानुवर्षे जिवंत असलेले विषाणू यांचा धोका सर्वाधिक असतो.


48,500 वर्षे जुना व्हायरस
युरोपियन संशोधकांनी रशियाच्या सायबेरिया प्रदेशात आढळलेल्या प्राचीन नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यांनी 13 नवीन सूक्ष्मजंतू शोधून काढले आहेत. शास्त्रज्ञांनी याला 'झोम्बी व्हायरस' असे नाव दिले असून अनेक हजार वर्षे बर्फाळ जमिनीत राहूनही ते संसर्गजन्य राहिले असल्याचे आढळले आहे. सर्वात जुना विषाणू, Pandoravirus yedoma, 48,500 वर्षे जुना होता, मात्र तो पुन्हा जिवंत झाला असून भविष्यातील महामारीला कारणीभूत ठरू शकतो. याआधी सापडलेला सर्वात जुना विषाणू 30,000 वर्षे जुना आहे. सायबेरियातील शास्त्रज्ञांनी 2013 मध्ये याचा शोध लावला होता.

मानव आणि प्राणी संक्रमित होऊ शकतात

रशिया, जर्मनी आणि फ्रान्सच्या संशोधकांच्या टीमने सांगितले की, शास्त्रज्ञांनी मान्य केले की हे विषाणू अतिशय धोकादायक आहेत. ते मानव आणि प्राण्यांना संक्रमित करू शकतात.

 

महत्त्वाच्या बातम्या

Giorgia Meloni : अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश
अभिनंदन डियर फ्रेंड... जॉर्जिया मेलोनींचा नवा राजकीय विक्रम, पंतप्रधान मोदींचा खास मैत्रिणीसाठी संदेश
50 हजार कामगारांच्या नोकरीवर गदा! 'या' प्रमुख कंपनीने घेतला मोठा निर्णय, चार प्रकल्प करणार बंद 
50 हजार कामगारांच्या नोकरीवर गदा! 'या' प्रमुख कंपनीने घेतला मोठा निर्णय, चार प्रकल्प करणार बंद 
देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका 
देव तारी त्याला कोण मारी! ना अन्न ना पाणी, तब्बल 9 दिवस मृत्यूशी झुंज, महापुरात अडकलेल्या 2 जणांची सुटका 
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Video: मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी तुंबलं, प्रवासी अडकून पडले; आगमन विभाग काही काळासाठी बंद करावा लागला
Embed widget