Taliban : तालिबान्यांचं नवं फर्मान, आता महिलांसाठी 'हा' नवा नियम
Taliban In Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांना डोळेही बुरख्यामध्ये झाकावे लागणार असण्याचं फर्मान तालिबान सरकारनं काढलं आहे.
Taliban In Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर विविध कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता शनिवारी पुन्हा महिलांसाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता महिलांना सार्वजनिक ठिकाणी डोळेही बुरख्याखाली झाकावे लागणार आहेत. तालिबान सरकारच्या नव्या आदेशानुसार महिलांना सार्वजनिक डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकावे लागणार आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंतचा बुरखा घालावा लागणार आहे. तालिबान प्रमुख हेब्तोल्लाह अखुंदजादाने शनिवारी महिलांसाठी कठोर निर्बंध जाहीर केले. तालिबान सरकारने फर्मानात म्हटले आहे की, ' महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत बुरखा परिधान केला पाहिजे. कारण हा पारंपारिक आणि आदरणीय पोशाख आहे.'
गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर, तालिबानने दावा केला होता की, त्यांचे शासन त्यांच्या आधीच्या शासनाच्या (1996 ते 2001 पर्यंत) तुलनेत पहिल्यासारख कठोर नसेल. पण तालिबान आपलं वचन पाळताना दिसत नाही. उलट तालिबानकडून महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. महिलांना अनेक सरकारी नोकऱ्या करण्यास, माध्यमिक शिक्षण घेण्यात आणि त्यांच्या शहरात किंवा अफगाणिस्तानबाहेर एकट्याने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
'काम नसेल तर महिलांनी घरीच थांबावे
तालिबान सरकारने महिलांना काही महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, जर महिलांना कोणतेही महत्त्वाचे काम नसेल तर त्यांनी घरीच राहणे चांगले आहे. या आधी तालिबान सरकानने महिलांसाठी बुरखा घालणे अनिवार्य केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 'वृद्ध महिला किंवा अल्पवयीन मुली वगळता सर्व महिलांना नव्या आदेशानुसार डोक्यापासून पूर्ण शरीर झाकणे बंधनकारक आहे. यामुळे त्यांचे संरक्षण होईल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- तालिबानचे अफगाणी महिलांसाठी नवे फर्मान, एकट्या महिलेला लांबच्या प्रवासावर बंदी
- Taliban : अफगाणिस्तानमध्ये मुलींना शिक्षण मिळणार? तालिबानने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
- मॉडेल बनण्याचं स्वप्न ठरलं महाग! बहिणीची भावाकडून गोळी झाडून हत्या