तालिबानचे अफगाणी महिलांसाठी नवे फर्मान, एकट्या महिलेला लांबच्या प्रवासावर बंदी
Taliban On Afghan Women : तालिबानने अफगाणिस्तानातील (Afghanistan) महिलांवर नवे निर्बंध लादले आहेत. यानुसार महिलांना लांब अंतराच्या प्रवासासाठी पुरुष नातेवाईकासोबत जावे लागणार आहे.
Taliban On Afghan Women : तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यापासून देशातील महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. आता तालिबानने नवे फर्मान काढले आहे. नवीन आदेशात म्हटले आहे की, महिलांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोबत पुरुष उपस्थित असणे आवश्यक असेल.
अफगाणमधील तालिबानच्या अधिकार्यांनी रविवारी सांगितले की, महिलांना लांबच्या प्रवासासाठी वाहतुकीसाठी पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय वाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही. मात्र, कमी अंतराच्या प्रवासावर निर्बंध नसतील. महिलांना कमी अंतराचा प्रवास एकट्याने करता येणार आहे. या सूचना तालिबानच्या 'स्प्रेडिंग वर्च्यु अँड प्रिव्हेंशन ऑफ इव्हिल' मंत्रालयाने जारी केल्या आहेत.
लांबच्या प्रवासासाठी पुरुषाने स्त्रीसोबत राहणे बंधनकारक
तालिबान सरकारचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी सांगितले आहे की, ''ज्या महिलांना 72 किमी प्रवास करायचा असेल त्यांच्यासोबत जवळचा पुरुष नातेवाईक असणे बंधनकारक आहे. महिलेसोबत पुरुष नातेवाईक नसल्यास महिलेला प्रवास करता येणार नाही. त्यांना प्रवासासाठीची परवानगी नाकारण्यात येईल. महिलेसोबत पुरुष असणे बंधनकारक असेल.''
याशिवाय वाहतूक करताना महिलेला हिजाब परिधान करणे बंधनकारक असेल. हिजाब परिधान न केलेल्या महिलेला वाहतूक सेवा पुरवण्यासही बंदी घातली आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
तालिबानी सरकारच्या या नव्या आदेशावर मानवी हक्क कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या हीदर बार यांनी म्हटले आहे की, महिलांना कैदेत ठेवण्यासाठी हे फर्मान आणखी एक नवीन पाऊल आहे.
तालिबान सरकारकडून महिलांवर अनेक बंधने
तालिबान सार्वजनिक क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेवर सातत्याने निर्बंध घालत आहे. महिलांना काम करण्यापासून रोखण्याबरोबरच त्यांनी मुलींना वर्गात वेगळे आणि पडद्यामागे बसण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर शाळांमधून मोठ्या प्रमाणात मुलींची नावे कमी करण्यात आली आहेत.
इतर बातम्या :
नागालँडमधील अफ्स्पा कायदा मागे घेण्यासाठी समिती गठीत
iPhone SE 3 : अॅपल आणणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 'आयफोन SE 3', 'हे' भन्नाट फिचर्स
Hair Care Tips : थंडीमध्ये ट्राय करा 'हे' हेअर मास्क, केस होतील मुलायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha