एक्स्प्लोर
Advertisement
मोदी हे दुबळे पंतप्रधान, चीनच्या अध्यक्षांना घाबरतात : राहुल गांधी
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागचा सुत्रधार असलेल्या 'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारत अपयशी ठरला आहे. त्याला कारण आहे चीन.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागचा सुत्रधार असलेल्या 'जैश-ए-मोहम्मद' या संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारत अपयशी ठरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचा हा चौथा प्रयत्न होता. परंतु सलग चौथ्यांदा चीनने यामध्ये खोडा घातला आहे. आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील भारताच्या मागणीला चीनने विरोध केला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. "नरेंद्र मोदी हे दुबळे पंतप्रधान असून ते चीनच्या अध्यक्षांना घाबरतात", असा टोला राहुल यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे, या ट्वीटमध्ये राहुल यांनी म्हटले आहे की, "दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा भारताविरोधात कोणतीही कारवाई करतो तेव्हा मोदींच्या तोंडून एकही शब्द बाहेर येत नाही. मोदी गुजरातमध्ये जिनपिंगसोबत झोपाळ्यावर झोके घेतात, दिल्लीत गळाभेट घेतात आणि चीनमध्ये मात्र त्यांच्यासमोर झुकतात", असे बोलून राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पातळीवर भारत अपयशी ठरला आहेत. त्याला चीन जबाबदार आहे. चीनने नकाराधिकार वापरुन मसूदचा बचाव केल्याने भारताला आज मोठा धक्का बसला आहे. दरम्यान याप्रकरणी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनी मसूदविरोधात भारताला पाठिंबा दिला आहे.
Weak Modi is scared of Xi. Not a word comes out of his mouth when China acts against India. NoMo’s China Diplomacy: 1. Swing with Xi in Gujarat 2. Hug Xi in Delhi 3. Bow to Xi in China https://t.co/7QBjY4e0z3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 14, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement