Pakistan : इस्लामाबादमध्ये युद्धजन्य परिस्थिती, इम्रान खान यांच्या मोर्चात हिंसाचार आणि जाळपोळ, लष्कर तैनात
Azadi March In Islamabad : पाकिस्तानमध्ये बुधवारी इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमध्ये आयोजित मोर्चामध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली.
Violence In Islamabad : पाकिस्तानमध्ये (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. गुरुवारीही इम्रान खान यांच्या समर्थकांकडून जाळपोळ आणि हिंसाचार करण्यात आला. पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ ( PTI-Pakistan Tehreek-E-Insaf) पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक इस्लामाबादमध्ये मोर्चा घेऊन पोहोचले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. निवडणुकीच्या नवीन तारखा जाहीर होईपर्यंत शाहबाज शरीफ हे क्षेत्र सोडणार नाहीत, असा इशारा इम्रान खान यांनी दिल्यानंतर इम्रान खान समर्थकांचा गोंधळ वाढला आहे. यानंतर पोलिसांकडून डी-चौकाजवळ पीटीआय समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी इम्रान खान समर्थकांनी हिंसाचार करत गोंधळ घातला तसेच मेट्रो स्टेशनलाही आग लावली.
सिनेट सदस्य हारून अब्बास बप्पी यांनी सांगितले, डी-चौकाच्या पायथ्याशी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इस्लामाबादमध्ये पोलीस आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये चकमक झाली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या पीटीआय समर्थकांचा मोर्चा रात्री उशिरा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाला. यावेळी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली तसेच इस्लामाबादमध्ये मोठा हिंसाचारही झाला. इम्रान खान यांच्या समर्थकांनी इस्लामाबादमधील मेट्रो स्टेशनलाही आग लावली.
इस्लामाबादमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ
इम्रान खान समर्थकांकडून जाळपोळ करण्यात आली. बुधवारी पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये असेच चित्र समोर आलं. बुधवारी हिंसक निदर्शनांदरम्यान इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या अनेक समर्थकांना पोलिसांनी अटक केली. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे समर्थक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. इम्रान खान समर्थकांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि लाठीचार्ज करण्यात आला. प्रत्युत्तरात संतप्त समर्थकांनीकडून दगडफेक करण्यात आली. त्याचवेळी शेकडो कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra : महाराष्ट्रात 2 कोटी 44 लाख पदं रिक्त, 'या' विभागांमध्ये होणार मोठी भरती
- Monsoon News : मान्सून येतोय... आज केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज
- Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळली, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू, 10 जण जखमी