एक्स्प्लोर

Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री हाईवेवर बोलेरो दरीत कोसळली, महाराष्ट्रातील तीन भाविकांचा मृत्यू, 10 जण जखमी

Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये बोलेरो दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात महाराष्ट्रातील भाविकांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

Uttarakhand Accident : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर ओझरी ते सायना चाटी दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरो वाहनाचा अपघात झाला. यामध्ये चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. इतर दहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बारकोटला निघाले होते वाहन

महाराष्ट्रातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो वाहन गुरुवारी सायंकाळी उशिरा जानकीछत्ती येथून बरकोटकडे रवाना झाले. रात्री उशिरा हे वाहन यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. बसला साईड देताना हा अपघात झाला. येथे चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट खोल दरीत कोसळली.

10 जखमींना दरीत बाहेर काढण्यात यश
पोलीस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचावकार्य राबवत चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढलं. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद होता आणि सुरक्षाव्यवस्था नव्हती.

जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी माहिती दिली की, यमुनोत्री येथे झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे

  • पूरण नाथ (वय 40) राहणार शिव दर्शन सीएचसी लि. पीएमजीपी कॉलनी महाकाली केव्स रोड, अंधेरी, (पूर्व) मुंबई.
  • जयश्री अनिल कोसरे (वय 26) राहणार तुमसर, भंडारा, महाराष्ट्र.
  • अशोक महादेवराव शांडे (वय 40) राहणार नागपूर, महाराष्ट्र.

जखमींची नावे (सर्व महाराष्ट्रातील रहिवासी)

  • प्रेरणा (वय 08) 
  • अंजू अशोक (वय 04) 
  • बोदी (वय 10) 
  • प्रमोद तुलसी राम (वय 52) 
  • बाळकृष्ण जितू (वय 41) 
  • लक्ष्मी बाळकृष्ण कोसरे (वय 46).
  • दिनेश (वय 35) 
  • मोनिक (वय 24) 
  • क्रिशिता (वय 15) 
  • रचना (वय 38) 

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
New RSS Head Quarters in Delhi : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Video : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरंABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 13 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सJaya Bachchan Rajya sabaha Video : राज्यसभेत खडाजंगी! जया बच्चन भयानक संतापल्या..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 13 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
New RSS Head Quarters in Delhi : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
Video : दिल्लीत आरएसएसची आलिशान इमारत, 150 कोटींचा खर्च, पावणे चार एकरातील 12 मजली टॉवर्समध्ये तब्बल 300 खोल्या अन् बरंच काही
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
मोठी बातमी! महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक, SP नवनीत काँवत यांचा निर्णय
Nashik Crime : नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 'त्या' मद्यधुंद तरुण-तरुणींना धिंगाणा घालणं भोवलं! अखेर गुन्हा दाखल, पोलीस निरीक्षकाचीही तडकाफडकी बदली, नेमकं काय घडलं?
PM Modi Flight Entered the Pakistani Airspace : पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
पॅरिसला जाताना पंतप्रधान मोदींचे विमानाचे पाकिस्तानी हवाई क्षेत्रात पाऊण तास उड्डाण
Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
Embed widget