Ukraine Russia War : रशियाला मोठा धक्का! उर्जा क्षेत्रातील शेल कंपनी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक गॅस खरेदी करणार नाही
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे. उर्जा क्षेत्रातील मोठी असलेली शेल कंपनी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक गॅस खरेदी करणार नाही. शेल कंपनीने याबाबतचे एक निवेदन जाहीर केले आहे.
Ukraine Russia War : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असताना रशियाला मोठा धक्का बसला आहे. उर्जा क्षेत्रातील मोठी कंपनी असलेली शेल ही कंपनी रशियाकडून तेल आणि नैसर्गिक गॅस खरेदी करणार नाही. शेलने म्हटले आहे की, रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी केला जाणार नाही. याबरोबरच रशियामधील सेवा केंद्रे देखील बंद करण्यात येतील, अशी माहिती शेल या कंपनीने दिली आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून रशियाला जगभरातील निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. अनेक देशांनी रशियावर आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर जगातील मोठ्या कंपन्यांनीही रशियाविरोधात पावले उचलली आहेत. आता शेल या कंपनीनेही रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेल कंपनी रशियाकडून तेल आणि वायूची सर्व खरेदी टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. रशियासोबतच्या व्यापार संबंधांमुळे आंतरराष्ट्रीय विरोधाचा सामना करत असलेल्या शेलने अल्पकालीन बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे सौदे त्वरित थांबवणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने मंगळवारी एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला पूर्ण जाणीव आहे की गेल्या आठवड्यात रशियन कच्चे तेल खरेदी करण्याचा आमचा निर्णय चुकीचा होता."
युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक कंपन्यांनी रशियावर निर्बंध जाहीर केले आहेत. बीपी पीएलसी आणि आणि एक्सॉन मोबिल कॉर्प (Exxon Mobil Corp ) सारख्या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनीही रशियावर निर्बंध घातले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शेलवर टीका केली होती.
जागतिक निर्बंध-ट्रॅकिंग डेटाबेसने मंगळवारी एक यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून जगभरातील अनेक देश रशियावर निर्बंध घालत आहेत. त्यामुळे रशिया हा सध्या सर्वात निर्बंध असलेला देश आहे. युक्रेनवर हल्ला करण्याच्या काही दिवस आधीपासून म्हणजे 22 फेब्रुवारीपासून रशियावर युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन मित्र राष्ट्रांनी निर्बंधांमध्ये वाढ केली आहे.
जागतिक निर्बंध-ट्रॅकिंग डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 22 फेब्रुवारीपूर्वी रशियावर 2 हजार 754 निर्बंध होते. परंतु, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाचे संकेत दिल्यापासून रशियावर 2,778 नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Ukraine Russia War: रशियाने 3 लाख नागरिकांना बनवलं बंधक, युक्रेनचा दावा
- Russia-Ukraine War : रशियासोबत युद्धादरम्यान युक्रेनमध्ये आरोग्य संकट अधिक गडद, WHO ने दिला इशारा
- Ukraine Russia War : 'मी कोणालाही घाबरत नाही', देश सोडण्याच्या बातम्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा व्हिडिओ, केला 'हा' दावा
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले