(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ukraine Russia War: रशियाने 3 लाख नागरिकांना बनवलं बंधक, युक्रेनचा दावा
Ukraine Russia War: रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दोन आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात युक्रेन रशियाला कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे.
Ukraine Russia War: रशिया आणि युक्रेनमध्ये मागील दोन आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात युक्रेन रशियाला कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. युक्रेनने 11,000 रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. आता याच दरम्यान त्यांनी रशियावर मोठा आरोप केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, रशियाने मारियुपोलमध्ये 3 लाख नागरिकांना बंधक बनवलं आहे. युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे.
दिमित्रो कुलेबा ट्वीट करत म्हणाले आहेत की, रशियाने मारियुपोलमध्ये 300,000 नागरिकांना बंधक बनवलं आहे. आयसीआरसीचा मध्यस्थी करार असूनही ते लोकांना शहर सोडण्यापासून रोखत आहेत. याच दरम्यान काल डिहायड्रेशनमुळे एका मुलाचा मृत्यू झाला असल्याचंही ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
Ceasefire violated! Russian forces are now shelling the humanitarian corridor from Zaporizhzhia to Mariupol. 8 trucks + 30 buses ready to deliver humanitarian aid to Mariupol and to evac civilians to Zaporizhzhia. Pressure on Russia MUST step up to make it uphold its commitments.
— MFA of Ukraine 🇺🇦 (@MFA_Ukraine) March 8, 2022
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे की, 'युद्धविरामाचे उल्लंघन! रशियन सैन्य आता Zaporizhzhia पासून मारियुपोलपर्यंत मानवतावादी कॉरिडॉरवर गोळीबार करत आहे. Zaporizhzhia मधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ट्रक आणि बसेस तयार आहेत. आपली वचनबद्धता पाळण्यासाठी रशियावर दबाव वाढवला पाहिजे.''
दरम्यान, रशियाने मंगळवारी युद्धविराम जाहीर केला होता. युक्रेनमधील चेर्निहाइव्ह, कीव, सुमी, खार्किव आणि मारियुपोल येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम लागू करण्यात आला होता. सोमवारी युक्रेनसोबत तिसऱ्या फेरीच्या चर्चेनंतर रशियाने हे पाऊल उचलले. मात्र चर्चेची ही फेरी देखील निष्फळ ठरली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine War : रशियासोबत युद्धादरम्यान युक्रेनमध्ये आरोग्य संकट अधिक गडद, WHO ने दिला इशारा
- Ukraine Russia War : 'मी कोणालाही घाबरत नाही', देश सोडण्याच्या बातम्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा व्हिडिओ, केला 'हा' दावा
- Russia Ukraine Conflict : पोलंडमधील 'ऑपरेशन गंगा' मोहीम फत्ते, जखमी हरजोतला घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले
- Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा 13 वा दिवस; तिसऱ्या फेरीतील चर्चाही निष्फळ
- Ukraine-Russia War: पत्नीला खोटं बोलून घरातून निघाला, अन् युक्रेन सैन्यात सामील झाला