इंडोनेशियामधील त्सुनामीतील मृतांचा आकडा 168 वर
समुद्रात असलेल्या क्रॅकटो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने भूस्खलन झालं आणि त्यामुळे त्सुनामी आली. सुमात्रा आणि पश्चिम जावाच्या समुद्रकिनारी भागात त्सुनामीमुळे मोठं नुकसान झालं आहे.
जकार्ता : इंडोनेशियात त्सुनामीने पुन्हा एकदा कहर केला आहे. शनिवारी रात्री आलेल्या त्सुनामीमुळे आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 600 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी आल्याची माहिती समोर येत आहे.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रात असलेल्या क्रॅकाटो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने भूस्खलन झालं आणि त्यामुळे त्सुनामी आली. त्सुनामीनंतर सुमात्रा आणि पश्चिम जावाच्या समुद्रकिनारी भागात मोठं नुकसान झालं आहे.
त्सुनामीमुळे या परिसरात मोठी वित्त आणि जीवितहानी झाली आहे. 168 जणांना यामध्ये मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी सप्टेंबर महिन्यातही इंडोनेशियाच्या सुलावेसी भागात भूकंप आणि त्सुमानीमुळे 832 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावेळी समुद्रात दीड मीटरपर्यंत उंच लाटा उसळल्या होत्या. समुद्राचं पाणी वेगाने भूभागात शिरलं होतं.