(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Masks in class : मास्कच्या वापरामुळे लहान मुलांच्या भाषेसह भावनिक आणि सामाजिक विकासावर परिणाम
मास्कच्या वापरामुळे लहान मुलांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. मास्कच्या वापरामुळे लहान मुलांवर होणाऱ्या परिणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
Masks in class : गेल्या दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे संकट आहे. या क्षेत्राचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. गेल्या 2 वर्षापासून लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरत आहेत. मास्कच्या वापरामुळे लहान मुलांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. मास्कच्या वापरामुळे लहान मुलांवर होणाऱ्या परिणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मास्कमुळे लहान मुलांच्या भाषेवर, भावनिक आणि सामाजिक विकासावर परिणाम झाल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाची रुग्णसंख्या सध्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे शाळेत मास्क वापरण्याचे बंधन हटवण्याची मागणी होत आहे.
मास्कचा वापर हा मुलांना चेहरे आणि भावना ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. मास्क हे मुलंच्या मौखिक संप्रेषणात व्यत्यय आणू शकतात. त्याचा मुलांच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मास्कच्या वापराचा भाषा सिकण्यावर मोठ परिणाम होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे मास्क वापराची पहिली भीती ही भाषा शिकण्याशी संबंधित आहे. जी आयुष्याच्या पहिल्या वर्षांत होते. मुले सामाजिक संवादातून बोलायला शिकतात . विशेषत उच्चारांचे विच्छेदन करण्यासाठी प्रौढांच्या तोंडाकडे ती पाहत असतात. मात्र, मास्कमुळे अनेक अडथळे येत आहेत.
अमेरिकन स्पीच-लँग्वेज-हीअरिंग असोसिएशन (एएसएचए) च्या डायन पॉल यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही बोलायला शिकता, तेव्हा तुम्ही चेहऱ्याकडे पाहता. पण हा एकमेव मार्ग नाही. तर मुले आवाज ऐकून आणि त्यांच्या आसपासच्या लोकांचे हावभाव आणि डोळ्यांच्या हालचालींचे अनुसरण करून देखील शिकतात. मात्र, आपण कायमच मास्क वापरत नाही. घरी मास्क वापरत नाही. त्यामुळे जास्त अडचण येत नसल्याचे पॉल यांनी म्हटले आहे. 2021 च्या अभ्यासात असे दिसून आले की, लहान मुले मास्क असतानाही शब्द ओळखण्यास सक्षम आहेत. परंतू, फ्रान्समध्ये केलेल्या अभ्यासानुसर, मास्कच्या वापर मुलांना शिकण्यात अडचणी निर्माण करुन शकतो. मुलांना वाचन करण्यामध्ये अडचण येऊ शकते असे म्हटले आहे.
दरम्यान, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, या मर्यादित उपलब्ध माहितीनुसार, हे स्पष्ट होत नाही की, मास्कच्या वापरामुळे मुलांचा भावनिक किंवा भाषेचा विकास कमी होतो. त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. एजन्सी दोन आणि त्याहून अधिक वयोगटातील लहान मुलांसाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची शिफारस करते. तर जागतिक आरोग्य संघटना ही पाच वर्षांच्या पुढील लहान मुलांचा मास्क वापरण्याचे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- COVID 19 new Variants: अजूनही काळजी घेणं गरजेचं, कोरोना व्हायरसला घेऊन WHO चं मोठं विधान, म्हणाले...
- महाराष्ट्रासह चार राज्यात 50 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण, आरोग्य मंत्रालय म्हणतेय धोका कायम