ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024
शिंदेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग...दादा भुसे, शंभुराज देसाई, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, प्रकाश सुर्वे सागर बंगल्यावर...तर शिंदेंचे कार्यकर्ते सिद्धिविनायकाच्या चरणी...
शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपद शिंदेंकडेच ठेवण्याचा वाढता सूर, नरेश म्हस्केंनी दिला बिहार पॅटर्नचा दाखला...तर निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नव्हता, रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर...
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला रवाना होणार, मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता...
आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी, भास्कर जाधव गटनेते तर सुनील प्रभू पुन्हा पक्षाचे प्रतोद...
मातोश्रीवरील बैठकीत ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित २० आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार, मागील फुटीचा अनुभव पाहता ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी...
विरोधी पक्षनेतेपदासाठी मविआच्या हालचाली, तिन्ही पक्ष मिळून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता, निवडणूकपूर्व आघाडी असल्याचा मविआचा युक्तिवाद...
भाजपकडून मुख्यमंत्री निवडीची घाई नाही, आधी संसदीय बोर्डाची मग नवनिर्वाचित आमदारांची आणि शेवटी महायुतीची बैठक होऊन मुख्यमंत्री निश्चित करणार...