Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 : संगमनेर विधानसभा मतदारसंघात अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलाय.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने (Mahayuti) 288 पैकी 236 जागा जिंकत नवा इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अक्षरशः धुव्वा उडाला. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. तर संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा धक्कादायक पराभव झाला. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यजीत तांबेयांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवारांच्या भेटीनंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की,अजितदादांनी मला विशेष करून विचारलं की, बाळासाहेब थोरात यांचा पराभव कशामुळे झाला? काय कारणे असावेत. त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विशेष दुःखही व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा सीनियर माणूस हा पराभूत व्हायला नको होता. शेवटी त्यांच्या अनुभवाचा सभागृहामध्ये होणारा वापर हा हे सर्व वरिष्ठ नेत्यांना गरजेचा होता.
संगमनेरचा निकाल धक्कादायक : सत्यजीत तांबे
बाळासाहेब थोरात यांची सभागृहातली कमी निश्चितच सर्व नेत्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. संगमनेरचा निकाल धक्कादायक आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केल असेल ते का केलं असेल? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे आम्ही आत्मपरीक्षण करू, असे देखील सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
धांदरफळ गावातून महायुतीला मताधिक्य
दरम्यान, संगमनेर विधानसभेत प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्या विषयी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत बेताल वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांच्या वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावातच महायुतीला मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले आहे. धांदरफळ बुद्रुक व धांदरफळ खुर्द या दोन्ही गावातून अमोल खताळ यांना 2945 तर बाळासाहेब थोरात यांना 1847 मतं मिळाली आहेत.
आणखी वाचा