एक्स्प्लोर

महाराष्ट्रासह चार राज्यात 50 हजारपेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण, आरोग्य मंत्रालय म्हणतेय धोका कायम  

Coronavirus Cases in India : देशातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मागील चार दिवसांपासून 1 लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशाच्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दरातही घसरण पाहयला मिळत आहे.

Coronavirus Cases in India : देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्रालयाची गुरुवारी पत्रकार परिषद झाली. यामध्ये देशातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे, मात्र धोका कायम आहे. त्यामुळे काळजी घ्यावी, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या चार राज्यात 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्यापैकी 61 टक्के रुग्ण या चार राज्यात आहेत. या राज्यांनी काळजी घ्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

आरोग्य सचिव म्हणाले की, देशातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे. पण लोकांनी काळजी घ्यावी. काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. पण एकूण देशातील परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्हे आहेत. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरीही काळजी घेणं थांबवू शकत नाही. कोरोना विषाणूबद्दल अद्याप आपल्याला सर्व माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सतर्क राहावे लागेल. देशातील रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. मागील चार दिवसांपासून 1 लाखापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशाच्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दरातही घसरण पाहयला मिळत आहे. देशाच्या एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्राचे प्रमाण-10.98% इतके आहे. महाराष्ट्राचा पॉझिटीव्हीटी दर गेल्या आठवड्यात 14.5% होता तो या आठवड्यात 7.3% टक्क्यांवर आला आहे. 7 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णसंख्या 1,77,131 होती ती आज 86,847 एवढी आहे.

वर्षभरापासून देशात कोरोना लसीकरण सुरु झाले आहे. जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. आरोग्य सचिव व्ही के पॉल म्हणाले की, देशातील 96 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.देशातील एकूण लसीकरण 171.28 कोटी इतके झाले आहे. यामधील 18 वर्षावली पात्र लोकांनी पहिला डोस घेतलेल्यांची संख्या  90.23 कोटी (96%) इतकी आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 73.29 कोटी  (78%) इतकी आहे.  15-18 वयोगटीतील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 5.09  कोटी (69%) आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या  1.05  कोटी  (14%) इतकी आहे.

सक्रिय रुग्ण आठ लाखांपेक्षा कमी -
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात देशात सरासरी 96 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले. मागील 24 तासांत देशात 66 हजार 84 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 7.9 लाख इतकी आहे. मागील चार दिवसांपासून दैनंदिन कोरोना रुग्णवाढ एक लाखांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या चार राज्यात प्रत्येकी 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांची संख्या आहे. 11 राज्यांत दहा हजार ते 50 हजारांच्या दरम्यान सक्रिय रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आहे. केरळमध्ये दोन लाख 50 हजारपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 86,000, तामिळनाडूमध्ये  77,000 आणि कर्नाटकमध्ये 60,000 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील 61 टक्के सक्रिय रुग्ण या चार राज्यातील आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Embed widget