Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्त
आमचा कोणताही आमदार फुटणार नाही, शिंदे गटाकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलं. इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड देखील नियमाप्रमाणे करण्यात आलेली आहे. विधिमंडळाच्या सभागृहाच्या नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे दानवे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी भास्कर जाधव आणि प्रतोद पदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही विधानभवनात जात आहोत असेही दानवे म्हणाले. महाविकास आघाडी विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ शिवसेना ठाकरे गट 20, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष 10 असे आहे. तर सभागृहाच्या एक दशांश म्हणजे एकूण 29 सदस्य एका पक्षाचे असणे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आहे. मात्र यामध्ये निवडणूक पूर्व आघाडी म्हणून महाविकास आघाडीने निवडणूक लढवल्याने एकत्रित मिळून विरोधी पक्षनेते पद मिळाव यासाठी प्रयत्न महाविकास आघाडीकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीची विनंती मान्य झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरे या नावाची चर्चा विरोधी पक्षनेता म्हणून सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.