Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती आणखी चिघळली, आंदोलनात 84 जण जखमी
Sri Lanka Financial Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर नागरिकांकडून जोरदार प्रदर्शनं करण्यात आली. यावेळी सुमारे 84 जण जखमी झाल्याचं समोर येत आहे.
Sri Lanka Financial Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकट आणखी चिघळताना दिसत आहे. बुधवारी राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर नागरिकांकडून जोरदार प्रदर्शनं करण्यात आली. यावेळी सुमारे 84 जण जखमी झाल्याचं समोर येत आहे. श्रीलंकेतील रुग्णालयाच्या रिपोर्टनुसार, बुधवारी पंतप्रधान आवासामध्ये जमाव घुसताना चेंगराचेंगरीत सुमारे 42 लोक जखमी झाले आहेत. तर संसदेजवळ रात्रभर सुरु असलेल्या निदर्शनामध्ये सुमारे 42 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 79 पुरुष आणि 7 महिला आहेत. यामध्ये एक सैन्य दलातील अधिकारी आणि दोन पोलिसांचाही समावेश आहे.
निदर्शनानंतर कर्फ्यू लागू
दरम्यान, बुधवारी सकाळी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदिवला गेल्याचया वृत्तानं देशातील जनता आणखीच संतप्त झाली. जनतेकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपासून गुरुवारी सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
गोटाबाया मालदीवनंतर सिंगापूरला जाण्याची शक्यता
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये आश्रय घेतला असल्याचे वृत्त आहे. गोटाबाया आता मालदीवहून (Maldives) सिंगापूरला (Singapore) जाण्याच्या तयारीत असून त्यासाठी एका खासगी विमानाची प्रतिक्षा करत असल्याचे वृत्त श्रीलंका डेली मिररनं दिलं आहे.
आंदोलकांचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासावर तळ
जनतेकडून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. निदर्शनं करत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर तळ ठोकला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच मुक्काम केला असून जोपर्यंत ते त्यांच्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत निवासस्थान सोडणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
आंदोलकांचा सरकारी वाहिनीवरही ताबा
आंदोलकांनी श्रीलंकेतील सरकारी वाहिनीवर मिळवत, भाषणे केली. त्यानंतर वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. श्रीलंकेत 84 हून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलकांना आवरण्यासाठी पोलीस, लष्कराला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या नागरिकांचं राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो सेशन, राष्ट्रपती निवासात संतप्त जनतेचा धुडगूस
- Sri Lanka Crisis : गोटाबाया यांची पळापळ; आधी मालदीव आणि आता 'या' देशात जाण्याची शक्यता
- US Inflation : अमेरिकेतही आर्थिक संकट, महागाई 40 वर्षातील विक्रमी पातळीवर, भारतावर होणार मोठा परिणाम