Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या नागरिकांचं राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो सेशन, राष्ट्रपती निवासात संतप्त जनतेचा धुडगूस
Sri Lanka Crisis Video : श्रीलंकेच्या जनतेनं राष्ट्रपती भवनावर ठाण मांडल्यानंतर तेथील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये नागरिक राष्ट्रपतींच्या खुर्चीवर फोटो सेशन करताना दिसत आहेत.
Sri Lanka Financial Crisis Video : श्रीलंकेतील आर्थिक संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. संतप्त नागरिकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासावरच मुक्काम केला आहे. राष्ट्रपती भवनावर अक्षरक्ष: धुडगूस घातल्याचं पाहायला मिळतंय. अशात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये नागरिक पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या निवासामध्ये आणि कार्यालयामध्ये मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत.
तू खींच मेरी फोटो...
आता व्हायरल झालेल्या एका व्हि़डीओमध्ये चक्क राष्ट्रपतींची खुर्चीवरच नागरिकांचं फोटो सेशन चालू असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेमधील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लोक आळीपाळीनं राष्ट्रपतींच्या खुर्चीवर फोटो काढताना दिसत आहेत. प्रत्येक नागरिक एकामागोमाग एक नंबर लावून राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून पोज देत फोटो काढत आहेत.
बारी बारी से राष्ट्रपति की कुर्सी की अदला बदली करने क्रांतिकारी युवा।#SriLanka pic.twitter.com/TrSCYFPPYN
— Surya Pratap Singh IAS Rtd. (@suryapsingh_IAS) July 13, 2022
श्रीलंकेच्या आर्थिक परिस्थितीचं वास्तव दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जगभरात याची जोरदार चर्चा आहे. हे व्हिडीओ फारच आश्चर्यचकित करणारे आहेत. हा फोटो सेशनचा व्हिडीओ रिटायर्ड आईएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह (Surya Pratap Singh) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.
राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसले आंदोलक
श्रीलंकेतील त्रस्त जनतेनं राष्ट्रपती आणि पंतप्रधानाचा राजीनामा मिळेपर्यंत राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासावरच तळ ठोकण्याची भूमिका घेतली आहे. या दरम्यान राष्ट्रपती निवासामधील नागरिकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आंदोलक एका मागोमाग एक खुर्चीवर बसून फोटो काढत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Viral Video : समुद्र किनारी मस्ती करणं तरुणीच्या अंगलट, अचानक लाट आली अन्...; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
-
Couple Fight : दोघातलं भांडण चव्हाट्यावर, मेट्रोतच सुरु हाणामारी, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : स्कूटीवरून बॅक फ्लिप करण्याचा 'अप्सरे'चा प्रयत्न पुरता फसला, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल