(Source: ECI/ABP News/ABP Majha)
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी, नागराज मंजुळेची खास उपस्थिती
'जाणता राजा'ला अभिवादन करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासात तेथील भारतीय जमले होते. या कार्यक्रमाला सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सिनेटचे सदस्य केविन थॉमस यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती.
न्यूयॉर्क : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव महाराष्ट्र किंवा भारतापुरता मर्यादित न राहता जगभर साजरा केला जातो. शिवजयंतीनिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
Deputy Consul General Shatrughna Sinha @ShatruSinha welcoming everyone at the #ShivJayanti Celebrations in #NewYork @IndiainNewYork pic.twitter.com/308V3e5szH
— Abhishek Suryawanshi (@AbhiSuryawanshi) February 18, 2019
आपल्या 'जाणता राजा'ला अभिवादन करण्यासाठी न्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीत तेथील भारतीय जमले होते. या कार्यक्रमाला सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सिनेटचे सदस्य केविन थॉमस यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. अमेरिकेतील शेकडो भारतीय या कार्यक्रमासाठी जमले होते.
Kevin Thomas @KevinThomasNY First Indian-American Senator from New York State pays tribute to Shivaji Maharaj in #NewYork @abpmajhatv@IndiainNewYork@MeghRaajPatil pic.twitter.com/yojrbb6HGu
— Abhishek Suryawanshi (@AbhiSuryawanshi) February 18, 2019
डेप्युटी कौन्सिल जनरल शत्रुघ्न सिन्हा यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
केविन यांनी उपस्थितांचे स्वागत करत शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. तसेच शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना सिनेटर केविन थॉमस यांनी व्यक्त केली.
It was an honor to pay tribute to Shivaji Maharaj. https://t.co/0Mkvytv9vS
— Senator Kevin Thomas (@KevinThomasNY) February 19, 2019
बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुखनेही व्हिडीओ मेसेजद्वारे शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Lai Bhari - Surprise by @Riteishd Riteish Deshmukh : Wishing everyone happy #ShivJayanti at Indian Consulate in New York through video message!@IndiainNewYork #NewYork #Bollywwod #NewYork #NYC pic.twitter.com/uSV9wGq2b1
— Abhishek Suryawanshi (@AbhiSuryawanshi) February 18, 2019
'सैराट' सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित होते. नागराज मंजुळे यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितांना संबोधित केलं. न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासातील हॉलमध्ये शेकडो शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
Famous Film Director Nagraj Manule @Nagrajmanjule addressing full packed room in New York on occasion of #ShivJayanti #NewYork #NYC #Maharashtra pic.twitter.com/YLtH4XzJIn
— Abhishek Suryawanshi (@AbhiSuryawanshi) February 18, 2019
शिवजयंतीनिमित्त सव्वा लाख चौरस फुटांची महारांगोळी, शिवराज्याभिषेक साकारला
पाहा व्हिडीओ - नरवीर तानाजी मालुसरेंची मूळ समाधी