(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : रशियाकडून युद्धात डॉल्फिनची मदत, हल्ला रोखण्यात करणार मदत
Russia Deploys Trained Dolphins : युक्रेन-रशिया युद्धात रशियन सैन्याने प्रशिक्षित लष्करी डॉल्फिन तैनात केले आहेत. हे डॉल्फिन पाण्याखालील हल्ला रोखण्याचं काम करतात.
Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशियामधील युद्ध अद्यापही सुरुच आहे. या संघर्षाला आता सुमारे दोन महिने पूर्ण झाले आहेत. रशियाकडून युक्रेनवरील हल्ले सुरुच आहेत. यामुळे लाखो युक्रेनियन नागरिक देशातूv पलायन करत आहेत. लाखो लोक शेजारील देशांत स्थलांतरित झाले आहेत. आता या युद्धात रशियाने डॉल्फिनची मदत घेतल्याची माहिती सॅटेलाइट छायाचित्रांमधून समोर येत आहे. रशियाने काळ्या समुद्रातील नौदल लष्करी तळावर प्रशिक्षित लष्करी डॉल्फिन तैनात केले आहेत. या अंदाज लावण्यात येत आहे की, रशियन नौदलाच्या ताफ्यावर पाण्याखालील हल्ला रोखण्यासाठी डॉल्फिनचा वापर केला जात आहे.
अमेरिकेच्या नेव्हल इन्स्टिट्यूटने (USNI) सॅटेलाइट फोटोंचे परीक्षण केलं. रशियाने फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केला तेव्हा दोन डॉल्फिन लष्करी तळावर नेण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. लष्करी कामासाठी डॉल्फिनला प्रशिक्षण देण्याचा जुना इतिहास आहे. रशिया लष्करी डॉल्फिनचा वापर समुद्राखालील गोष्टी शोधण्यासाठी आणि शत्रूला रोखण्यासाठी करत असल्याची माहिती आहे.
Just for the people *really* into #OSINT, this is how I found it. That blob just screams "dolphin pens"
— H I Sutton (@CovertShores) April 27, 2022
Now for a glass pic.twitter.com/bwjcmkM2Xl
सेवास्तोपोल बंदर रशियन सैन्यासाठी म्हत्त्वाचं
हे फोटो सेवास्तोपोल बंदराचे असल्याचं समोर आलं आहे. हे बंदर रशियन सैन्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे बंदर क्रिमियाच्या दक्षिण भागात आहे. USNI ने दिलेल्या माहितीनुसार, या बंदरावर अनेक रशियन जहाजांची मोठी येजा सुरु असते. या बंदावर लष्कराचा तळ असण्याचं मुख्य कारण म्हणजे हे बंदर शत्रूच्या मिसाईल रेंजच्या बाहेर आहे. मात्र या बंदरावर पाण्याखालून हल्ला होण्याची भीती असते. यासाठी इथे पाण्याखालून होणाऱ्या हल्ल्यांपासून सावध होण्यासाठी दोन डॉल्फिनला प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी
- Afghanistan Blast : दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं अफगाणिस्तान, 13 जण जखमी तर 9 लोकांचा मृत्यू
- Twitter : ट्विटरकडून युजर्स मोजण्यात झालेली चूक मान्य, सांगितलं 'हे' कारण
- Indonesia Palm Oil Ban : इंडोनेशियाच्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील बंदीचा परिणाम, देशात पामतेलाचे दर कडाडले