100 Most Influential People: जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; झेलेन्स्की, पुतिन आणि अदानींचा समावेश
100 Most Influential People: टाईम मॅगझिनने 2022 मधील जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
![100 Most Influential People: जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; झेलेन्स्की, पुतिन आणि अदानींचा समावेश Releases list of 100 most influential people in the world; Zelensky, Putin and Adani 100 Most Influential People: जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; झेलेन्स्की, पुतिन आणि अदानींचा समावेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/23/89ede1896d2bdf9f1d6a944a8ef6f4b9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
100 Most Influential People: टाईम मॅगझिनने 2022 मधील जगातील टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, अॅपलचे सीईओ टिम कुक आणि मिशेल ओबामा यांचाही समावेश आहे. या यादीत काश्मिरी कार्यकर्ते खुर्रम परवेझ, उद्योगपती गौतम अदानी आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील करुणा नंदी यांचेही नाव आहे.
या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, अमेरिकन राजकारणी केविन मॅककार्थी, रॉन डेलांटिस यांच्यासह अनेक अमेरिकन राजकीय व्यक्तींच्या नावांचाही समावेश आहे. तसेच या यादीत सर्वात तरुण प्रभावशाली व्यक्तींचे नाव Eileen Gu आहे, तर सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नावात फेथ रिंगगोल्डचे नाव आहे. फ्रीस्टाइल स्की स्टार Eileen चे वय 18 वर्षे आहे, तर लेखक फेथ रिंगगोल्ड यांचे वय 91 वर्षे आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश
याशिवाय 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचाही समावेश आहे. यावर्षीच्या यादीत त्यांचा समावेश झाल्याने जिनपिंग 13व्यांदा या यादीत सामील झाले आहेत. याशिवाय जो बायडन, क्रिस्टिन लगार्ड, टिम कुक हे पाचव्यांदा सामील झाले आहेत.
खेळाडूंमध्ये या नावांचा समावेश
या मासिकात पीट डेव्हिडसन, अमांडा सेफ्रीड, सिमू लिऊ, मिला कुनिस, ओप्रा विन्फ्रे, अशा अनेक बड्या चेहऱ्यांना मनोरंजन क्षेत्रात स्थान देण्यात आले आहे. अॅलेक्स मॉर्गन, नॅथन चेन, कँडेस पार्कर, आयलीन गु, अॅलेक्स मॉर्गन, मेगन रॅपिनो आणि बर्की सॉरब्रुन या खेळाडूंचीही नावे या यादीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
PM Modi Japan Visit: भारत IPEF मध्ये झाला सामील; पंतप्रधान मोदी म्हणाले: मित्र राष्ट्रांसोबत मिळून करू काम
India Helps Sri Lanka: भारताचा श्रीलंकेला मदतीचा हात, 40000 मेट्रिक टन पेट्रोल पाठवले
PM Modi Japan Visit: जपान आमचा पारंपरिक मित्र, हे नाते आदराचे आणि सामर्थ्याचे आहे: पंतप्रधान मोदी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)