एक्स्प्लोर

Asia Cup Final: आशिया कपच्या फायनलपूर्वी दिग्गज गोलंदाज पाकिस्तानच्या मदतीला, टीम इंडियाला हरवण्याचा फॉर्म्युला सांगितला, फायनल अटीतटीची होणार

Wasim Akram Tips to Pakistan : वसीम अक्रम यानं पाकिस्तानच्या टीमनं फायलनमध्ये भारताविरुद्ध कसा खेळ करावा हे सांगितलं आहे.

दुबई : आशिया चषकाच्या फायनलमध्ये (Asia Cup Final 2025) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने अंतिम फेरीत लढणार असल्यानं या महामुकाबल्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भारतानं आशिया चषकात आतापर्यंत सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करतोय. तर, पाकिस्तानचं नेतृत्त्व सलमान आगा करतोय. भारत आणि पाकिस्तान यंदाच्या आशिया चषकात दोन वेळा आमने सामने आले होते. भारतानं पाकिस्तानला त्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. फायनलपूर्वी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं भारताविरुद्ध टीमनं काय करायला पाहिजे याचा सल्ला दिला आहे. 

Wasim Akram Tips to Pakistan : वसीम अक्रमच्या पाकिस्तानला टिप्स 

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आणि माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्ताननं भारताची फलंदाजी सुरु असताना लवकर विकेट घेतल्या पाहिजेत. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलची लवकर घेतल्यास भारताला बॅकफूटवर पाठवता येऊ शकतं. फायनल मॅच रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. बेस्ट टीम जिंकेल, अशी आशा असल्याचं वसीम अक्रम यानं म्हटलं. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी फायनल होणार आहे. त्या मॅचसाठी भारताला अधिक पसंती नक्कीच आहे.तुम्ही किंवा क्रिकेट प्रेमींनी पाहिलं आहे, मी पाहिलं आहे. या फॉरमॅटमध्ये काहीही घडू शकते. एक चांगली खेळी, एक चांगला स्पेल या फॉरमॅटमध्ये सामन्याचा निकाल बदलू शकतो. पाकिस्ताननं रविवारी आत्मविश्वासानं खेळावं, मुमेंटमचा फायदा घ्यावा,सेन्सिबल क्रिकेट खेळावं. पाकिस्ताननं सुरुवातीला विकेट घेतल्या तर ते भारताला बॅकफूटवर ढकलू शकतात, असं वसीम अक्रम यानं म्हटलं.  

भारत पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने सामने

आशिया चषक 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंंबरला ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये आमने सामने आले होते. भारतानं त्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान 21 सप्टेंबरला आमने सामने आले. त्यामध्ये देखील भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. 

आशिया चषकाच्या फायलनमध्ये पहिल्यांदा आमने सामने

भारत आणि पाकिस्तान आशिया चषकाच्या 41 वर्षाच्या इतिहासात अंतिम सामन्यात पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. गौतम गंभीरच्या मार्गदर्शनातील सूर्यकुमार यादवच्या टीम पुढं आता अंतिम फेरीत पाकिस्तानचं आव्हान असेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget