(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pizza Party in Space : अंतराळात पिझ्झा पार्टी, नासाने शेअर केलेले फोटो व्हायरल
Pizza Party in Space : नासाने इंस्टाग्रामवर अंतराळवीरांचे (Astronauts) काही फोटो पोस्ट केले आहे. यामध्ये अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) पिझ्झा पार्टी करताना दिसत आहेत.
Pizza Party in Space : नासा (NASA) नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करणारे प्रयोग करत असते. यावेळी पुन्हा एकदा नासाची इंस्टाग्राम पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नासाने अंतराळवीरांचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) 'पिझ्झा नाईट'चा आनंद घेताना दिसत आहेत. या फोटोसह नासाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'ऑर्बिटल रेस्टॉरंटचं दर्शन' (Visions of an orbital restaurant).
नासानं लिहिलं आहे की, 'आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) जीवनाचा एक भाग. क्रू सदस्य आपल्यापासून सुमारे 250 मैल (402 किमी) परिभ्रमण करत आहेत. पण ते पृथ्वीवरील काही गोष्टींमुळे कायमच जवळ आहेत. जसं की पिझ्झा नाईट.'
फोटोंमध्ये अंतराळवीरांची पिझ्झा पार्टी
इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, ISS चे सदस्य डेनिस मॅटवीव, ओलेग आर्टेमयेव, सर्गेई कोर्साकोव्ह, केजेल लिंडग्रेन, जेसिका वॅटकिन्स आणि सामंथा क्रिस्टोफोरेटी यांचा समावेश आहे. क्रू मेंबर्स पिझ्झासोबत पोज देताना दिसत आहेत.
View this post on Instagram
क्रूचे सदस्य आवडते पदार्थ निवडू शकतात
नासानं म्हटलं आहे की, ISS चे क्रू मेंबर्सना पृथ्वीपासून 250 मैल अंतरावर (सुमारे 402 किमी) असले तरीही, कोणताही आवडता पदार्थ निवडण्याचा पर्याय आहे. त्यांना सर्व शक्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी अंतराळ संस्थेचे जॉन्सन स्पेस सेंटर आहे. नासानं सांगितलं की, हे पदार्थ नासा जॉन्सन स्पेस सेंटरच्या स्पेस फूड सिस्टीम प्रयोगशाळेतून येतात आणि क्रू सदस्य आवडता पदार्थ निवडू शकतात. यासाठी मेनूमधून 200 पेक्षा जास्त पदार्थांचा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या