एक्स्प्लोर

NASA Released Stunning Video of Jupiter : NASA च्या 'जुनो'कडून सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह 'गुरु' कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल

NASA Released Stunning Video of Jupiter : यूएस स्पेस एजन्सी नासाच्या (NASA) जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनं इंस्टाग्रामवर गुरू ग्रहाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

NASA Released Stunning Video of Jupiter : अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) नेहमीच अंतराळ आणि इतर ग्रहांवरील घटनांशी संबंधित अनेक मनोरंजक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अनेकदा अंतराळ आणि तिथे घडणाऱ्या घटनांबाबत आपल्या मनात उत्सुकता असते. ती उत्सुकता नासा पूर्ण करते. नुकताच नासानं एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनं इंस्टाग्रामवर गुरू ग्रहाचा (Jupiter) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गुरूची झलक दिसली आहे. गुरु ग्रहाचं हे मनमोहक रुप पाहुन नेटकरी सुखावले आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे फुटेज नासाच्या जुनो मिशनने त्याच्या जवळून उड्डाण करताना कॅमेऱ्यात कैद केलं होतं. 9 एप्रिल रोजी गुरू ग्रहाच्या 2,500 मैल (3,200 किलोमीटर) अंतरावरुन शूट करण्यात आलं आहे. जूनोचं हे गुरूवरचं 41वा उड्डाण होतं आणि त्याचा वेग आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या वेगापेक्षा सातपट अधिक होता. 

नासाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, हा व्हिडीओ अॅनिमेटेड सीक्वेन्सच्या स्वरूपात आहे. जो इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. हे सिटिझन सायंटिस्ट अँड्रिया लक यांनी जुनोकॅम फोटोंमधील डेटा वापरून तयार केलं आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये, "#JunoMission सोबत राईड घ्या." असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. 

नासानं दिलेल्या माहितीनुसार, जूनोला यावर्षी सप्टेंबरमध्ये युरोपाचे जवळून आणि अधिक तपशीलवार दर्शन मिळेल, जेव्हा तो अनेक दशकांमधील रहस्यमय चंद्राच्या सर्वात जवळून उड्डाण करेल.

जूनो हे पाच वर्षांच्या प्रवासात ऑगस्ट 2011 मध्ये नासानं लॉन्च केलं होतं. जुलै 2016 मध्ये ते गुरूवर पोहोचलं. ते 2025 पर्यंत सूर्यमालेतील सर्वात मोठ्या ग्रहावर तपास सुरू ठेवेल आणि त्यानंतर हे अभियान संपेल.

यापूर्वी, जूनो यानानं गुरूच्या सर्वात मोठ्या चंद्राचं छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. ज्यामध्ये आपल्या सौरमालेतील हा सर्वात मोठा चंद्र असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचं नाव गॅनिमेड आहे. 7 जून 2021 रोजी नासाच्या जूनोचे पहिले दोन फोटो गुरूच्या महाकाय चंद्राच्या फ्लायबायवरून मिळालं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget