एक्स्प्लोर

Zombie Pigeons : कबूतर बनतायत 'झॉम्बी', कारण ठरतोय नवा धोकादायक विषाणू

Pigeon Paramyxovirus : ब्रिटनमध्ये कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली आहे. या रोगाची लागण झाल्यावर कबूतर ( Zombie Pigeon ) एखाद्या झॉम्बीप्रमाणे वागू लागतं.

Pigeon Paramyxovirus : कबूतरांना ( Pigeon ) नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतर 'झॉम्बी' ( Zombie ) बनत असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कबूतरांवर पॅरामिक्सोव्हायरस ( PPMV - Pigeon Paramyxovirus ) या रोगाचं संकट कोसळलं आहे. या रोगाची लागण झाल्यावर कबूतर एखाद्या झॉम्बीप्रमाणे वागू लागतं, म्हणून काही नेटकऱ्यांनी या कबूतरांचा 'झॉम्बी कबूतर' असा उल्लेख करत आहेत. कबूतरांवरील हा नवा आजार ब्रिटनमध्ये पसरल्याचं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. या विषाणूची लागण झाल्यावर कबूतराचं मेंदूवर संतुलन राहत नाही, यामुळे त्याला मानेचा तोल सांभाळणं कठीण होतं, शिवाय कबूतराची उडण्याची क्षमताही निघून जाते. 

मीडिया रिपोर्टनुसार, पिजन पॅरामिक्सोव्हायरसला ( Pigeon Paramyxovirus ) PPMV किंवा न्यूकॅसल रोग ( Newcastle Disease ) म्हणजे पक्षांमध्ये पसरणारा संसर्गजन्य आजार असेही म्हणतात. या रोगाची लक्षणे कबूतराचं मानेवर नियंत्रण नसणे आणि उडण्याची शक्ती नसणे, तसेच पंख आणि पाय थरथर कापणे, ही आहेत. सध्या ब्रिटनमधील कबूतरांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासह न्यू जर्सीमध्ये या विषाणूची लागण झाल्याने काही कबूतरांचा मृत्यू झाला आहे. सध्या या विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही.

ब्रिटनमधील कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरसची लागण

ब्रिटनमध्ये कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली आहे. यामुळे ब्रिटनमधील कबूतरांचा जीव धोक्यात आहे. हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून याची लागण झालेल्या कबूतरांमध्ये मान फिरणे, पंख थरथरणे अशी लक्षणे दिसतात. या आजाराची लागण झालेल्या कबुतराला हालचाल करता किंवा उडता येत नाही. या आजाराची लागण झालेल्या कबूतरांना हिरव्या रंगाची विष्ठा होते. हा रोग कबुतरांवरील अतिशय घातक आजार आहे.

झॉम्बी कबूतराचा व्हायरल व्हिडीओ  येथे : पाहा

View this post on Instagram
 
A post shared by Lofty Hopes - Pigeon Positive (@loftyhopespigeonpositive)

मज्जासंस्थेवर परिणाम करतो पिजन पॅरामिक्सोव्हायरस

हा आजार कबुतरांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो, त्यामुळे कबुतराला हालचाल करता येत नाही, तसेच कबुतराला उडताही येत नाही. यामुळे कबुतराची मान फिरते, तर हवेत उडता उडता जमिनीवर कोसळल्याचंही पाहायला मिळत आहे. कबुतरांवरील हा आजार अत्यंत प्राणघातक आहे. सध्या या आजाराने ब्रिटनमधील कबुतरांना लक्ष्य केलं आहे. माणसाला या आजाराची लागण होऊ शकत नाही. हा पक्ष्यांमधील आजार आहे.

पिजन पॅरामिक्सोव्हायरस काय आहे? ( What is Pigeon Paramyxovirus )

  • पिजन पॅरामिक्सोव्हायरस ( Pigeon Paramyxovirus ) हा मज्जासंस्थेचा आजार ( Neurological ) आहे.
  • हा पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कबूतरांमध्ये पसरणारा आजार आहे. 
  • या रोगाला PPMV किंवा न्यूकॅसल रोग असेही म्हणतात.
  • माणसाला या आजाराचा धोका नाही.
  • 2011 साली ऑस्ट्रेलियामध्ये हा आजार आढळून आला होता.
  • हा आजार मज्जासंस्थेवर म्हणजेच मेंदूवर परिणाम करत असल्याने कबूतराचा शरीराचा तोल सांभाळणे कठीण होते.
  • कबूतराचं मानेवर आणि शरीरावर संतुलन राहत नाही, त्यामुळे कबूतरांना उडता येत नाही. 
  • तसेच या आजाराची लागण झालेलं कबूतर मान फिरलेल्या अवस्थेत गोल-गोल चक्कर काढताना पाहायला मिळतं.
  • सध्या या आजारावर लस उपलब्ध नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget