एक्स्प्लोर

Pfizer Vaccine : Omicron वर Pfizer लस किती प्रभावी? अभ्यासात माहिती उघड

Pfizer Vaccine Effect on Omicron : ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Varient) फायझर (Pfizer) ची कोविड लस (Covid Vaccine) Omicron विरुद्ध कमी अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती तयार करते.

Pfizer Vaccine Effect on Omicron : ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) जगभराची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनवरील (Omicron) लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन आणि अभ्यास सुरु आहे. फायझर (Pfizer) ची कोरोना लस डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी चिंताजनक बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संशोधकांनी केलेल्या प्राथमिक अभ्यासात असे आढळून आले आहे की. कोरोना विषाणू (कोविड-19) विरुद्ध फायझरची लस कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरियंटविरूद्ध कमी अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती तयार करते. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत या आधीच संशोधन आणि अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी नवीन लसीची आवश्यकता नाही. तथापि, काही अहवालात असे समोर आले की, ओमायक्रॉनवर नवीन लस आवश्यक असल्यास, ती तयार करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही कारण लस कंपन्यांकडे आधीच कोरोनाची मूळ लस आहे. 

आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटचा प्रयोग
डरबनमधील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांमध्ये असे आढळून आले आहे की, दोन वर्षांपूर्वी चीनमध्ये आढळलेल्या कोरोना प्रकाराच्या तुलनेत ज्यांनी Pfizer-BioNtech च्या लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. मात्र ओमायक्रॉन विरोधात 40 टक्क्यांनी कमी प्रतिक्रारक्षमता म्हणजेच अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजेच, फायझर लस ओमायक्रॉनवर केवळ अंशतः परिणामी आहे.

संशोधन प्रमुख अॅलेक्स सिगल यांचे विधान
प्रयोगशाळेतील संशोधन प्रमुख अॅलेक्स सिगेल यांनी सांगितले की, ''रोगप्रतिकारक शक्तीचे नुकसान लक्षणीय आहे. परंतु रोगावर लसीचा प्रभाव आणि परिणाम यांची अचूकता योग्यरित्या समजून घेण्यासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे.''

ओमायक्रॉन 40 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला
गेल्या महिन्यात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमायक्रॉन व्हेरियंट आता प्रकार आता जगातील 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होतं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget