![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Varient : नव्या 'Omicron' व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही?, Pfizer, BioNTech चं मोठं विधान
New Corona Varient Omicron : जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना विषाणूचा (WHO) नवा व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' (Omicron) अतिशय धोकादायक असल्याचं घोषित केलं आहे.
![Omicron Varient : नव्या 'Omicron' व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही?, Pfizer, BioNTech चं मोठं विधान pfizer not sure on vaccines effectiveness on new covid variant omicron Omicron Varient : नव्या 'Omicron' व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही?, Pfizer, BioNTech चं मोठं विधान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/9b878c89c2af218251ac3c71b83e34a6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जगभरात सध्या कोरोना (Corona) च्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटवर कोरोना लस प्रभावी आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक (BioNTech) नं या संदर्भात मोठं विधान केलंय. फायझरची लस नव्या 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटवर लस किती प्रभावी असेल याबाबत काही निश्चितपणे सांगू शकत नसल्याचं कंपनीनं म्हटलंय.
दरम्यान, स्पुटनिकच्या अहवालानुसार, फायझर आणि बायोएनटेकनं सुमारे 100 दिवसांत नव्या व्हेरिएंटवर प्रभावी लस तयार करण्याचा दावा केलाय. जागतिक आरोग्य संघटनेनं नव्या व्हेरिएंटला 'ओमिक्रॉन' (B.1.1.529) असं नाव दिलं आहे. 'ओमिक्रॉन' हा एक ग्रीक शब्द आहे.
100 दिवसांत तयार करणार लस : फायझर आणि बायोएनटेक
फायझर आणि बायोएनटेक कंपनीनं म्हटलं की, ''आम्हांला आशा आहे की, आम्ही नव्या व्हेरिएंटवर 100 दिवसांत प्रभावी लस विकसित करणे आणि उत्पादन करण्यात सक्षम आहोत.'' स्पुटनिकच्या अहवालानुसार, फायझर आणि बायोएनटेक आगामी दोन आठवड्यात 'ओमिक्रॉन'वर प्रभावी लस निर्माण करण्याची शक्यता आहे.
फायझर आणि बायोएनटेक सांगितलंय की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपासून खूप वेगळा आहे. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी महिनाभर आधीच नव्या व्हेरिएंटवर लस बनवण्याची तयारी सुरु केल्याचं सांगितलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी
कोरोनाचा नवा ओमिक्रोन व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळला, ज्याने जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशांनी या व्हेरिएंटपासून बचाव व्हावा यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घातली आहे. या देशांमध्ये अमेरिका आणि कॅनडा यां देशांचा समावेश आहे. याशिवाय इतर देशांनीही दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर निर्बंध लावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron covid new variant : नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती
- नवीन कोरोना व्हायरस 'चिंतेचा', WHOनं दिलं 'हे' नाव, धोका अधिक!
- Omicron Varient: नवीन व्हेरियंटची पुण्यालाही भीती? नव्यानं निर्बंध घालण्याबाबत अजित पवाराचं मोठं वक्तव्य
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)