एक्स्प्लोर

Omicron Varient: नवीन व्हेरियंटची पुण्यालाही भीती? नव्यानं निर्बंध घालण्याबाबत अजित पवाराचं मोठं वक्तव्य

संपूर्ण जग आता नव्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही काही महत्त्वाच्या सूचना पुणेकरांना दिल्या आहेत.

पुणे : कोरोना महामारीला (Corona) आटोक्यात आणण्यासाठी मागील बऱ्याच काळापासून जगभरात अनेक उपाय-योजना सुरु आहेत. भारतातही युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. पण या सर्वामध्येच आता दक्षिण आफ्रिका देशात एक नवा कोरोना व्हेरियंट (Omicron Varient) जन्माला आल्याने सर्व जगाचे टेन्शन वाढले आहे. नव्या उपाययोजनां घेऊन प्रशासन सज्ज झालं असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेत पुणेकरांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील परिस्थितीबाबत सांगताना पवारांनी महत्त्वाची माहिती देण्यासह निर्बंध घालावे लागू शकतात, तसंच परिस्थिती पाहून पुढील उपाययोजना आखल्या जातील असंही म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसोबत ऑनलाईन बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'पुण्यातील परिस्थिती बरी, पण बंधने घालावी लागू शकतात'

पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत सांगताना अजित पवार म्हणाले,'सध्या पुण्यातील परिस्थिती बरी आहे, पण जागतिक पातळीवर नवीन व्हेरियंट पसरतोय. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून भविष्यात नव्याने काही बंधने घालावी लागू शकतात, असं तज्ज्ञांचंही मत आहे.'

विमानसेवेबाबत वरिष्ठांशी चर्चा करणार

राज्याचे मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधाकार्यांची ऑनलाइन बैठक घेत असल्याचं पवारांनी सांगितलं. तसचं परदेशातून येणाऱ्या विमानांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत प्रश्न उपस्थित करणार आहे. तसंच सध्यातरी विमान प्रवास करणाऱ्या डोमेस्टिक ट्रॅव्हलर्सवर कोणतेही बंधने नसून आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर केंद्र सरकारच्या सूचनांनुसार बंधने येतील, असं पवार म्हणाले.

1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु

पुणे जिल्ह्यातील करमणूकीच्या कार्यक्रमांबाबतही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसंच भिमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचंही ते म्हणाले.

आरोग्य व्यवस्थाही तयार ठेवणार

पुण्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जंबो कोवीड हॉस्पिटल्सचे स्ट्रक्चर आहे तसेच ठेवण्यात येणार आहे. असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.   

संबधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget