Omicron covid new variant : नव्या व्हेरिएंटचा धोका किती, उपाय काय? A टू Z माहिती
ICMRचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. कोविडबाबत असलेल्या खबरदारीच्या नियमांचे पालन करावे असेही त्यांनी म्हटले.
Coronavirus new variant : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. विषाणूच्या नवीन स्वरूपाला घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन ICMRचे माजी संचालक डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि कोविडबाबतची खबरदारी बाळगण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले.
या विषाणूमुळं दवाखान्यात भर्ती व्हावं लागतंय, का मृत्यू जास्त होत आहेत का याबाबत अधिक स्पष्टता नसल्याचे डॉ. गंगाखेडकर यांनी म्हटले. आफ्रिकेतील परिस्थिती वेगळी आहे. आपल्याकडे यासाठी काही वेळ आहे. अर्थात काळजी घ्यावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परिस्थिती अजून गंभीर झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. या विषाणूमध्ये 50 म्युटेशन आहेत. लस घेतली म्हणून कोविड खबरदारीचे नियम पाळणार नाही अशी भावना बाळगणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांनी प्राधान्याने लस घ्यावी असेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले.
> हा नवा व्हेरियंट काय आहे, तो किती धोकादायक आहे
>> व्हेरियंट बनवणे या विषाणूची एक नैसर्गिक टेंडेंन्सी आहे. हा विषाणू आपल्या पासून इतर विषाणू तयार करण्यासाठी ज्या एन्झाइमची गरज असते. त्यामध्ये दोष आहे. त्यातून विषाणूचा नवीन व्हेरिएंट तयार होतो. हा नवीन विषाणू व्हेरिएंटमध्ये 50 म्युटेश आहे. स्पाइक प्रोटीनद्वारे रोगप्रतिकार शक्तीत वाढ करण्याचा प्रयत्न करतो. हा वेरिएंट लशीला दाद देई का ही शंका आहे. चाचणीतही विषाणूच्या जेनेटिक्स स्ट्रक्चरमध्ये बदल झाल्याने उपचारात बदल करावा लागणार का हे पाहावं लागेल. उपचाराच्या पद्धतीत फार बदल करावा लागणार नाही. हा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्याच्यामध्ये फैलावण्याची क्षमता अधिक आहे. लशीला दाद न देणारा हा विषाणू असू शकतो. मात्र, त्याबाबतचा पुरावा आढळला नाही. नवीन विषाणूला घाबरून जाण्याचे कारण नाही. या विषाणूमुळे रुग्णलयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या वाढली का, बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले का, याची पुरेशी माहिती समोर आली नाही. विषाणूबाबत आणखी सविस्तर माहिती येणे बाकी आहे. लस न घेतलेल्या लोकांनी लस घ्यावी. लशीमुळे बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
> आता सरकारने कोणती तातडीची पावलं उचलायला हवी आहेत
>> सरकारने दोन गोष्टी तातडीने करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशामध्ये हा विषाणू इतर देशातून येऊ नये यासाठी विषाणूबाधित देशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी. RTPCR केली एसजीएम दिसत नसेल आणि ती व्यक्ती बाधित असेल तर त्याला ओमीक्रॉनची बाधा असू शकते. दुसर म्हणजे, लक्षणे असलेल्या लोकांची कोविड चाचणी झाली पाहिजे. लस घेतली असली तरी कोणतेही दुर्लक्ष करता कामा नये. तिसरी गोष्टी म्हणजे एक जरी प्रकरण आढळले तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून विलगीकरण, चाचणी करावी.
> ओमीक्राॅनची लक्षणं काय
>> ओमीक्रॉनबाबतच्या लक्षणाबाबत ठोस माहिती अजून उपलब्ध नाही. अजूनही रुग्णांची संख्या कमी आहे. रुग्ण संख्या कमी असली तरी तातडीने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात झाली आहे.
> हा व्हेरियंट आतापर्यंत कुठे कुठे पसरल्याची भीती व्यक्त होतेय?
>> या व्हेरियंटचा शोध लागला तो हाँगकाँगमध्ये. बाधित व्यक्ती आफ्रिकेतून हाँगकाँगमध्ये आली. बोत्सवाना, बेल्जियममध्ये प्रकरणे आढळून आले आहेत. इतरत्र कुठे असेल याबाबत अजून माहिती नाही. बाधित व्यक्तींद्वारे हा संसर्ग फैलावणार. त्यामुळे काळजी घेऊन या बाधित व्यक्तींचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
पाहा सविस्तर मुलाखत :
इतर महत्त्वाच्या बातम्या:
कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे
लस घेतली तरीही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक, WHO चं आवाहन