एक्स्प्लोर
पतीने गुगल मॅप्सवर पत्नीला बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं!
पेरु देशात राहणारी संबंधित व्यक्ती एका ब्रिजवर पोहचण्यासाठी गुगल मॅप्सच्या मदतीने जवळचा रस्ता शोधत होती.

मुंबई : रस्ता शोधण्यासाठी हल्ली अनेक जण 'गुगल मॅप्स'ची मदत घेतात, मात्र दिशा शोधताना पेरु देशातील एका व्यक्तीच्या आयुष्याला नवीन 'दिशा' मिळाली. संबंधित व्यक्तीने गुगल मॅप्सवर पत्नीला तिच्या बॉयफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं. पेरु देशातील इच्छित ब्रिजवर पोहचण्यासाठी पती गुगल मॅप्सच्या मदतीने जवळचा रस्ता शोधत होता. मात्र 'स्ट्रीट व्ह्यू' फोटोग्राफ्स बघताना त्याला ओळखीची आकृती सापडली. पांढरा टीशर्ट आणि जीन्स घातलेली ही स्त्री दुसरी-तिसरी कोणी नसून आपली पत्नी असल्याचं त्याने ओळखलं. एका बेंचवर बसलेल्या पत्नीच्या मांडीवर तिच्या बॉयफ्रेण्डने डोकं ठेवलं होतं. हे पाहून पतीचा तिळपापड झाला. तातडीने त्याने पत्नीला याचा जाब विचारला आणि तिनेही आपलं अफेअर असल्याचं कबूल केलं. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. गूगल स्ट्रीट व्ह्यू वेहिकलने जगभरातील कार, बाईक यासह अनेक लोकेशन्सचं 360 अंशात चित्रण केलं आहे. त्यामुळे जोडीदाराला फसवून तुम्ही तिसऱ्याच व्यक्तीसोबत असल्याचं कदाचित गूगलच्या नजरेतून सुटलं नसेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण























