एक्स्प्लोर
पाकिस्तानपासून सर्वाधिक धोका, अमेरिकेच्या थिंक टँकचा इशारा
वॉशिंग्टन : अमेरिकेची थिंक टँक द सेंटर फॉर स्ट्रॅटजिक अॅण्ड इंटरनॅशनल (CSIS) ने आपल्या आहवालात पाकिस्तानपासून सर्वाधिक धोका असल्याचं मत मांडलं आहे. तसेच तालिबानी आणि हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी अजूनही पाकिस्तानात आसरा घेत असल्याचं सांगितलं आहे.
अमेरिकेच्या CSIS संस्थेने काल 5 जून रोजी आपला अहवाल सादर केला असून, यात ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तानबद्दल सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ''अफगाणिस्तानतील संघर्षाच्या काळात येथील राजकीय व्यवस्था, प्रशासन आणि नागरीक अनंत अडचणींचा सामना करत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानात तालिबानी आणि हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी आसरा घेत आहेत. तेव्हा अफगाणिस्तानच्या पडत्या काळात तेथील शासन व्यवस्था मजबूत करण्यासाठी मदत केली पाहिजे,'' असंही यात सांगितलं आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानबाबत कठोर भूमिका घेण्याचा सल्ला देताना, ''जोपर्यंत पाकिस्तान तालिबानी आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना पोसणं बंद करत नाही, तोपर्यंत त्यांना मिळणारी मदत बंद करावी. तसेच पाकिस्तानवर बंदी घातली पाहिजे,'' असंही CSIS नं स्पष्ट केलं आहे.
शिवाय, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी चीन आणि अमेरिकेचं संबंध चांगले असणं दोन्ही देशांसाठी हिताचं असल्याचं CSIS नं म्हणलं आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून, पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच अमेरिकेच्या एका थिंक टँकनेही पाकिस्तानबाबत सावध भूमिका बाळगण्याची सूचना केल्याने, त्याचा ट्रम्प प्रशासनाकडून यावर काय हलचाली होतील हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
कारण, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 100 पेक्षा जास्त अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या पाठिमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप अफगाणिस्तान सरकारने केला होता. त्यामुळे CSIS च्या सूचनांमुळे पाकिस्तानवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अरब देशाच्या दौऱ्यावेळी पाकिस्तानचे पंप्रधान नवाज शरीफ यांना बोलूही दिलं नव्हतं. त्यातच पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदतीत कपात करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement