Jammu Kashmir Terror Attack: 'लवकर हल्ला करा, माझी परिक्षा...', पाकिस्तानी नागरिकांनीच उडवली स्वतःच्या देशाची खिल्ली, व्हिडीओ पाहून शाहबाज डोकं आपटतील
Jammu Kashmir Terror Attack: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाबाबत सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले गेले आहेत. अशातच सोशल मिडियावरती पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्याच देशाची बदनामी केल्याचं आणि भारताला लवकर हल्ला करा असं आवाहन केल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.

India Vs Pakistan War: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केला आहे. पाकिस्तानने 30 एप्रिलपासून आपल्या सीमेत सरावाला सुरूवात केलेली आहे. भारताने पाकला कठोर पावलं उचलत त्याला योग्य उत्तर दिले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचीही चर्चा आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. पाकिस्तानी नागरिक स्वतःच त्यांच्या देशाची थट्टा करत आहेत. पाकिस्तानवर खूप कर्ज आहे. याबद्दल एक मीम देखील बनवण्यात आलं आहे.
खरं तर, पाकिस्तानला सोशल मीडियावर खूप लाजिरवाण्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. शुभम नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिक स्वतःच्या देशाची खिल्ली उडवत आहेत. एका पाकिस्तानी तरुणाने म्हटले, "जर भारताने आपल्यावर कब्जा केला तर त्याला आपले सर्व कर्ज फेडावे लागेल.""बाबर आझमला त्यांना त्यांच्या संघात ठेवण्यास भाग पाडले जाईल, मग विचार करा की त्याच्या संघाचा किती डाउनफॉल होईल.'' पाकिस्तानी नागरिकांनी अनेक अशा गोष्टींवर भाष्य करत पाकची चेष्टा केली आहे, जे ऐकून त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ डोकं धरून बसतील.
View this post on Instagram
भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी पाणी करार रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानबद्दल मीम्स बनवले जात आहेत. व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी मुलाने म्हटले आहे की, "मी आंघोळ करत नाही म्हणून मला काळजी नाही." असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले गेले आहेत. त्याच वेळी, एक तरुण म्हणाला, "इंडिया, तुम्हाला जे काही करायचं आहे ते लवकर करा, माझ्या परीक्षा येणार आहेत." पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. यासोबतच, त्यांनी पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
भारताच्या भीतीमुळे पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती
भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये भीतीचे वातावरण आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी गुरुवारी संकेत दिले की जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते.सुरक्षेच्या परिस्थिती लक्षात घेता, नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक मदरशांना 10 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.























