एक्स्प्लोर
Advertisement
मुकेश अंबानी 20 दिवस देशाचा खर्च चालवू शकतात
डिसेंबर 2017 पर्यंत या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची त्या-त्या देशाच्या दैनिक राष्ट्रीय खर्चाशी तुलना करण्यात आली. 49 देशांतील 49 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी करण्यात आली
नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना सरकारचा खर्च भागवण्यास सांगितलं, तर आपल्या सर्व संपत्तीतून ते किती दिवस देश चालवू शकतील? या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. 40.3 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीतून अंबानी भारत सरकारचा 20 दिवसांचा खर्च चालवू शकतात.
एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देश चालवण्याची वेळ आली, तर तो त्याच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो? असा तुलनात्मक अहवाल ब्लूमबर्गनं 2018 रॉबिनहूड इंडेक्समधून प्रकाशित केला आहे. 49 देशांचा अभ्यास करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
सायप्रस देशाचे सर्वात श्रीमंत नागरिक जॉन फ्रेडीक्सन सर्वात जास्त कालावधीसाठी आपला देश चालवू शकतात. 10.4 बिलियन संपत्ती असलेले फ्रेडीक्सन आपल्या देशाचा कारभार 441 दिवसांसाठी म्हणजे जवळपास सव्वा वर्ष चालवू शकतात. त्यानंतर हाँगकाँगच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा (191 दिवस) क्रमांक लागतो.
सर्वाधिक दिवसांचा विचार करता मुकेश अंबानींचा पाचवा क्रमांक लागतो. टॉप 10 च्या यादीत चीनचा क्रमांक तळाला आहे. ते अवघे चारच दिवस स्वतःच्या पैशांनी सरकारचा खर्च भागवू शकतात. मुळात हा क्रम सर्वात श्रीमंत व्यक्तींनुसार नसून, त्यांची वैयक्तिक संपत्ती आणि त्या-त्या देशाचा एका दिवसाचा राष्ट्रीय खर्च यांच्या ताळमेळीवर अवलंबून आहे.
कोणत्या देशाची सर्वात श्रीमंत व्यक्ती किती दिवस देश चालवू शकते?
1. चीन - जॅक मा - 4 दिवस
2. अमेरिका- जेफ बेझोस - 5 दिवस
3. यूके- ह्यूग ग्रॉसव्हेनॉर - 5 दिवस
4. जर्मनी - डायटर श्वॉर्त्झ - 5 दिवस
5. भारत - मुकेश अंबानी- 20 दिवस
6. सौदी अरेबिया - अलवलिद बिन तलाल - 26 दिवस
7. स्पेन - अमँशिओ ओर्तेगा - 48 दिवस
8. मेक्सिको - कार्लोस स्लिम - 82 दिवस
9. हाँग काँग- लि का शिंग - 191 दिवस
10. सायप्रस - जॉन फ्रेडीक्सन - 441 दिवस
डिसेंबर 2017 पर्यंत या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या एकूण संपत्तीची त्या-त्या देशाच्या दैनिक राष्ट्रीय खर्चाशी तुलना करण्यात आली. 49 देशांतील 49 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये फक्त चार महिलांचा समावेश आहे. अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिले आणि नेदरलँड्स या चार देशांतील सर्वात श्रीमंत व्यक्ती महिला आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement