तरूणाने सोडली नेटफ्लिक्समधील तब्बल साडे तीन कोटी पगाराची नोकरी, कारण ऐकून व्हाल थक्क
Netflix : मायकल लिन हा नेटफ्लिक्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. परंतु, नोकरीचा कंटाळा आल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्याने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे.
Netflix : सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळणे अवघड झाले आहे. शिवाय खूप प्रयत्नानंतर मिळालीच तर नोकरीत टिकून राहण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरी मिळते, करोडो रुपये पगार मिळतो. तरीही ते नोकरी सोडतात. नुकतेच असेच एक उदाहणर पुढे आले आहे. अमेरिकेतील नेटफ्लिक्समध्ये (Netflix) काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. या व्यक्तीचा पगार वार्षिक तब्बल साडेतीन कोटी रुपये होता. परंतु,एवढ्या मोठ्या पगाराची नौकरी सोडण्याचे काणर ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. नेटफ्लिक्समध्ये इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या मायकेल लिन (Michael Lin) याने नोकरीचा कंटाळून आल्याच्या कारणावरून नोकरी सोडली आहे.
मायकल लिन हा नेटफ्लिक्समध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. परंतु, नोकरीचा कंटाळा आल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्याने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे. लिन याला कंपनीची काही अडचण नव्हती. त्याला वर्षाला जवळपास साडे तीन कोटी रूपये पगार होता. शिवाय कंपनीतच सर्व प्रकारचे जेवण मोफत मिळत असे. एवढेच नाही तर पाहिजे त्यावेळी सुट्टी मिळे. असे असताना देखील त्याने अचानकच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. लिन याने नोकरी सोडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
नोकरी सोडण्याबाबत लिन सांगतो की, त्याचा निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्यांच्या कुटुंबीयांना याचा मोठा धक्का बसला. शिवाय त्याच्या गुरूनेही त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरी नोकरी मिळेपर्यंत ही नोकरी सोडायला नको होती, असेही त्यांचे मत होते."
हा निर्णय घेणे मायकेलसाठी सोपे नव्हते. काम करताना त्याला खूप काही शिकायला मिळाले. पण हळूहळू कोरोनाचा काळ संपल्यानंतर त्याला आपले काम कंटाळवाणे वाटू लागले. त्यामुळेच त्याने तत्काळा नोकरीचा राजीनामा दिला.
कोट्यवधींचा पगार मिळवणाऱ्या लिनने नोकरी सोडल्यानंतर त्याला खूप फरक पडला असेल असे सगळ्यांनाच वाटत आहे. पण त्याला काही फरक पडला नाही. नोकरी सोडल्यानंतर आठ महिने तो निर्माते, लेखक, उद्योजक यांना भेटला. आता त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आहे.