एक्स्प्लोर

चेन्नईच्या इंजिनिअरने बनवलाय ISIS चा झेंडा!

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयएसआयएसचा झेंडा आणि याचा लोगो बनवणाऱ्या मोहम्मद नासिरने चेन्नईतून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. एनआयएने शुक्रवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात याचा उल्लेख आहे. एनआयएने या प्रकरणी नासिरच्या वडिलांना प्रमुख साक्षीदार केलं आहे. कोर्टात आता 9 जून रोजी या प्रकरणावर सुनावणी होईल.   नासिरला कुठे आणि कसं पकडलं?   - चेन्नईमधील कॉलेजमध्ये बीई करत असतानाच नासिर 2014 मध्ये दुबईत वेब डेव्हलपर म्हणून नोकरीही करत होता.   - आयएसआयएसच्या प्रोपगेंडा व्हिडीओने प्रभावित होऊन तो सुदानला गेला.   - मात्र सुदानमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्यो त्याला भारताकडे सुपूर्द करण्यात आलं.   - मुलगा सीरियामधील युद्धात सहभागी होण्यासाठी गेला आहे अशी माहिती नासिरच्या वडिलांनीच दिली.   - नासिरला शोधण्यासाठी त्याचे वडील आमेर मुहम्मद पैकर दुबईहून भारतात पोहोचले होते.   - आमेर यांचा जबाब सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत नोंदवण्यात आला.   - आमेर यांना मुलाविरोधात महत्त्वाचा साक्षीदार म्हणून वापरण्यात येणार आहे.   - एनआयए आमेर आणि नासिरमध्ये झालेले ई-मेल, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअॅप मेसेज पुरावे म्हणून सादर करणार आहे.   नासिरचा वडिलांना मेसेज   - आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच एनआयएने न्यायाधीश अमर नाथ यांना सांगितलं होतं की, नासिरने सुदानहून वडिलांना भावनिक मेसेज केला होता. मी इथे अतिशय आनंदी आहे, असं त्याने लिहिलं होतं.   - त्याने लिहिलं होतं की आई आणि सुमैयाची काळजी घ्या. मी इथे सुरक्षित आहे. इथलं आयुष्य फारच सुंदर आहे. मला वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी सीरियाला यावं.   नासिर सुदानला कधी आणि कसा पोहोचला?   - 2008: इस्त्रायल, आरएसएस आणि विहिंपविरोधात तिरस्कार पसरवण्यासाठी नासिरने इस्लामिक ऑर्गनायझेशन तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) मध्ये प्रवेश केला होता.   - ऑगस्ट 2011: त्याने चेन्नईमधून एथिकल हॅकिंगचा चार महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स केला होता.   - 2014: त्याने मुस्लिम आणि जिदाहींवर होणाऱ्या अत्यचारांबाबत लिहिण्यासाठी वेबसाईट बनवली होती.   - फेब्रुवारी 2015: ट्विटरच्या माध्यमातून नासिर हमीदान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला, जो इस्लाम Q&A नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवायचा. इथूनच त्याने आसिससाठी लोगो बनवण्यास सुरुवात केली.   - एप्रिल 2015: मेसेजिंग अॅप टेलीग्रामवर अकाऊंट सुरु केलं आणि आयएसआयएसमध्ये सामिल लोकांच्या संपर्कात आला.   - ऑगस्ट 2015: नासिर नंतर एका मुल्लाच्या संपर्कात आला. त्याने नासिरला सुदान येण्यास सांगितलं, जिथून तो सीरियाला जाऊ शकेल.   - 25 सप्टेंबर 2015: नासिरने विमाने दुबईहून सुदानला रवाना झाला. यानंतर वडिलांना ई-मेल केला की, मी आयएसआयएसमध्ये सामिल होण्यास जात आहे.   - 5 ऑक्टोबर 2015: नासिरला सुदान प्रशासनाने त्याब्यात घेतलं. त्यानंतर 10 डिसेंबरला त्याला भारताकडे सोपवण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget