Malaysia New PM : अन्वर इब्राहिम मलेशियाचे नवे पंतप्रधान, आज घेणार शपथ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
Anwar Ibrahim Malaysia PM : अन्वर इब्राहिम यांनी मलेशियाचे नवे पंतप्रधान होणार असून आज त्यांचा शपथविधी पार
Malaysia New Prime Minister : सुधारणावादी नेते अन्वर इब्राहिम यांची ( Anwar Ibrahim ) मलेशियाच्या पंतप्रधानपदी (Prime Minister) नियुक्ती करण्यात आली आहे. मलेशियाच्या राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह ( King Sultan Abdullah Ahmad Shah ) यांनी ही घोषणा केली आहे. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली होती. मलेशियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे सरकार स्थापनेवर प्रश्नचिन्ह होतं. मात्र मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी अन्वर इब्राहिम यांची मलेशियाने नवे पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. अन्वर इब्राहिम मलेशियाचे दहावे पंतप्रधान आहेत.
अन्वर इब्राहिम होणार मलेशियाचे नवे पंतप्रधान
मलेशियाचे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी आज मलेशियाचे विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहिम यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. सुलतानच्या या घोषणेने देशातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनेक दिवसांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ संपली आहे. सुलतान यांनी सांगितलं आहे की, नवीन पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आजच पार पडणार आहे.
संध्याकाळी 5 वाजता शपथविधी
मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी सांगितलं की, आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, शनिवारच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानेतर कोणत्याही पक्षामध्ये स्पष्ट बहुमत नव्हतं. यामुळे संसदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. यामधील एका गटाचे नेतृत्व अन्वर इब्राहिम हे करत होते आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व माजी पंतप्रधान मुहिद्दीन यासिन (Muhyiddin YassinI) यांच्याकडे होते.
कोन आहेत अन्वर इब्राहिम? (Who is Anwar Ibrahim)
अन्वर इब्राहिम मलेशियाचे दहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. 1990 च्या दशकात त्यांनी मलेशियाचे उपपंतप्रधान पद सांभाळलं आहे. इब्राहिम यांची सुधारणावादी नेते अशी ओळख आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते तुरुंगात गेले होते. मात्र हे आरोप फेटाळत त्यांना याला राजकीय कट असल्याचं म्हटलं. अन्वर इब्राहिम 2018 मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.
Congratulations Dato' Seri @anwaribrahim on your election as the Prime Minister of Malaysia. I look forward to working closely together to further strengthen India-Malaysia Enhanced Strategic Partnership.
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2022
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्वर इब्राहिम यांना मलेशियाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'मलेशियाचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्याबद्द्ल अन्वर इब्राहिम यांचं अभिनंदन. भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.'