Pakistan New Army Chief : असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख; पण राष्ट्रपती मान्यता देणार की नाही?
Pakistan New Army Chief : लेफ्टनंट जनरल असीम मुनीर (Lieutenant General Asim Munir) यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुनीर जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील.
Pakistan New Army Chief : लेफ्टनंट जनरल असीम मुनीर (Lieutenant General Asim Munir) यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी मुनीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर माहिती मंत्री मरीयुम औरंगजेब यांनी मुनीर यांच्या नावाची घोषणा ट्विटरवरून केली. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील, असे औरंगजेब यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुनीर जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील. जे 29 नोव्हेंबर रोजी लष्करप्रमुख म्हणून त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपवतील.
पाकिस्तानच्या इतिहासात आजवर लष्कर प्रबळ राहिले आहे. लोकनियुक्त सरकार पाडण्यात, अडचणी निर्माण करण्यापर्यंत पाकिस्तानात लष्करी खेळ झाला आहे. पंतप्रधान शरीफ यांनी आज घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत सहा नावांवर चर्चा करून मुनीर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मुनीर सध्या रावळपिंडीमध्ये लष्करी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी काही काळासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय Inter-Services Intelligence (ISI) प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
मुनीर यांच्या नावाला राष्ट्रपती मान्यता देणार?
संरक्षण मंत्र ख्वाजा आसिफ यांनी मुनीर आणि शमशाद यांच्या मान्यतेसाठी राष्ट्रपती अरीफ अल्वी यांच्याकडे नावे पाठवण्यात आली आहेत. राष्ट्रपती तेथील सेनादलांचे प्रमुख आहेत. अल्वी विरोधी बाकावर असलेल्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षातील आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान या पक्षाचे अध्यक्ष आहेत. इम्रान खान यांनी आपल्या आवडीचा लष्करप्रमुख निवडण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
एका ट्विटमध्ये, संरक्षण मंत्री आसिफ यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणता, अल्वी राजकीय सल्ल्याकडे किंवा घटनात्मक आणि कायदेशीर सल्ल्याकडे लक्ष देतील का? आता इम्रान खान यांना देशाचे रक्षण करणार्या संस्थेला बळकटी द्यायची आहे की वादग्रस्त यामध्ये त्यांची कसोटी आहे. राष्ट्रपती अल्वी यांच्यासाठीही ही परीक्षा आहे. ट्विटरवर औरंगजेब यांनी केलेल्या घोषणेनंतर लगेचच, खान यांच्या पीटीआयने ट्विटरवर हवाला दिला की इम्रान खान आणि अल्वी दोघेही “संविधान आणि कायद्यानुसार वागतील. खान यांनी राजकीय फायद्यासाठी नवीन लष्करप्रमुखांची नियुक्ती वादग्रस्त केल्याचा आरोप सरकारने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या