एक्स्प्लोर

UAE Flight : पासपोर्टवर पूर्ण नाव नसेल तर यूएईला प्रवास करता येणार नाही

Travellers without Full Name : पासपोर्टवर एकच नाव असलेल्या प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये ( UAE ) प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Passengers with Single Name on Passport : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पासपोर्टवर पूर्ण नाव नसेल तर तुम्हाला यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (  UAE ) प्रवास करता येणार नाही. इंडिगो एअरलाइन्सने UAE अधिकार्‍यांच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार पासपोर्टवर एकच नाव असलेले म्हणजे पूर्ण नाव नसलेल्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सोमवारी 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. 

इंडिगोनो जारी केलेल्या नवीन निवेदनानुसार, प्रवाशाच्या पासपोर्टवर सिंगल नेम म्हणजे फक्त नाव असेल तर त्याला युएईमध्ये प्रवास करता येणार नाही. व्यक्तीच्या पासपोर्टवर किमान दोन शब्द असलेलं नाव असणं गरजेचं असेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या पासपोर्टवर फक्त 'समीर' किंवा आमिर असं एक शब्दाचं नाव असेल, तर त्या पासपोर्टवर तुम्हाला युएईमध्ये प्रवेश मिळणार नाही. पासपोर्टवर तुमचं पूर्ण नाव असणं किंवा किमान दोन शब्द असणं गरजेच आहे. एकच नाव असणारे प्रवासी किंवा पर्यटक यांना परवानगी दिली जाणार नाही.

संयुक्त अरब अमिरातीने इंडिगो एअरलाइन्सला याबाबतील सूचना दिल्या आहेत की, एकच नाव असणाऱ्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. 21 नोव्हेंबर 2022 पासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, स्थायी नागरिक किंवा कामासाठी येणाऱ्या नागरिकांना या निमयातून सूट देण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाइनने प्रवाशांना त्यांच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्यास किंवा अधिक माहितीसाठी त्यांच्या वेबसाइट hwpadkpahw.bwu ला भेट देण्यास सांगितलं आहे.

दरम्यान, या निर्णयमागचं कारण युएई प्रशासनाने सांगितलेलं नाही आहे. इंडिगो कंपनीला युएईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्टवर समान नाव असलेल्या आणि निवास परवाना किंवा कायमस्वरूपी व्हिसा असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल. इंडिगो एअरलाइन्सने UAE अधिकार्‍यांच्या हवाल्याने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार पासपोर्टवर एकच नाव असलेले म्हणजे पूर्ण नाव नसलेल्या प्रवाशांना युएईमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

निवेदनानुसार, या नवीन नियमांमधून काही प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. यामध्ये ज्या प्रवाशांकडे वैध निवासी व्हिजा आणि पासपोर्ट आहे, ज्यांच्याकडे कामानिमित्तचा व्हिसा आहे, अशा प्रवाशांना या नियमामधून सूट मिळणार आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तींनी व्हिसामध्ये किंवा पासपोर्टमध्ये नावाच्या दोन्ही रकान्यांमध्ये आपलं नाव अपडेट केलं असेल. त्यांनाही या नियमातून सवलत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Embed widget