Israel Vs Iran : इस्त्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत; नेत्यान्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
Israel Iran Tension : इराण आपला बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्रामचा विस्तार करत असल्याचा संशय इस्त्रायला आहे. असं झाल्यास संपूर्ण पश्चिम आशियाच्या सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो असं इस्त्रायलचं मत आहे.

Israel Iran Tension : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांची महत्त्वपूर्ण भेट 29 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या भेटीत इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्राम (Iran Ballistic Missile Program) आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इराणवर कारवाई करण्यासंबंधी इस्त्रायलची भूमिका नेत्यानाहू हे अमेरिकेसमोर मांडणार असल्याची माहिती आहे.
Israel Iran Tension : इराणविरोधात कारवाईचा मुद्दा ऐरणीवर
या बैठकीत पंतप्रधान नेतन्याहू इराणविरोधात कठोर भूमिका मांडण्याची शक्यता असून, संभाव्य लष्करी कारवाईसाठी अमेरिकेचा पाठिंबा मागू शकतात. NBC News च्या अहवालानुसार, इस्त्रायलला अशी चिंता आहे की इराण आपला बॅलिस्टिक मिसाइल निर्मिती कार्यक्रम वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
Middle East Conflict : इराण-इस्त्रायल युद्धानंतर चिंता वाढली
याच वर्षी इराण आणि इस्त्रायलमध्ये जवळपास दोन आठवडे युद्ध झाले होते. या संघर्षादरम्यान इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल प्रोग्रामचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा होती. मात्र आता इस्त्रायली अधिकाऱ्यांना शंका आहे की इराण युद्धात उद्ध्वस्त झालेले अणु प्रकल्प (Nuclear Sites) पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे. हे प्रकल्प युद्धादरम्यान अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत नष्ट झाल्याचा दावा करण्यात आला होता.
Iran Ballistic Missile Program : संपूर्ण प्रदेश धोक्यात
इस्त्रायलच्या मते, इराणची ही हालचाल फक्त इस्त्रायलसाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशिया आणि अमेरिकेच्या हितांसाठीही मोठा धोका ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर नेतन्याहू हे डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे इराणविरोधी कोणत्याही लष्करी मोहिमेत अमेरिकेची थेट भागीदारी आणि मदत मागण्याची शक्यता आहे.
US Iran Nuclear Threat : व्हाइट हाउसची भूमिका काय?
दरम्यान, व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या अॅना केली (Anna Kelly) यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) आणि इराण सरकारनेही अमेरिकेच्या या मताला दुजोरा दिला आहे की, ‘ऑपरेशन मिडनाइट हॅमर’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत इराणच्या अणु क्षमतांचा पूर्णपणे नायनाट झाला होता.
अॅना केली म्हणाल्या की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले आहे की, इराणने जर पुन्हा अणवस्त्र तयार करण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी थेट हल्ला करून ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येईल.”
Netanyahu Trump Meeting : जगाचे लक्ष या भेटीकडे
नेतान्याहू–ट्रम्प भेटीतून इराणविरोधातील अमेरिकेची पुढील रणनीती काय असणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही भेट पश्चिम आशियातील भू-राजकीय समीकरणे बदलणारी ठरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा:























