Iran Vs Israel War: इस्रायली हल्ल्यानं राजधानी तेहरान दुहेरी संकटात; शहरात पूर, सर्वत्र दुर्गंधीचं साम्राज्य, बॉम्बपेक्षा धोकादायक रोगराईची भीती
Iran Vs Israel War : इराणने रविवारी पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढलाय. तर दुसरीकडे इस्रायली हल्ल्यांमध्येही प्रचंड प्रमाणात नासधूस झालीय.

Iran Vs Israel War : इराणने रविवारी पुन्हा एकदा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढलाय. तर दुसरीकडे इस्रायली हल्ल्यांमध्येही प्रचंड प्रमाणात नासधूस, विध्वंस झाला असून मोठी जीवित हानी झालीय. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 224 लोकांचा मृत्यू 1200 हून अधिक जखमी झाल्याचं इराणच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी (14 जून ) सांगितलंय.
अशातच आता इराणची राजधानी असलेलं तेहरान शहर देखील सध्या दुहेरी संकटात सापडलं असल्याचे चित्र आहे. कारण इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे आणि त्यानंतर उद्भवलेल्या सीवेज संकटामुळे तेहरान शहरातील नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करवा लागत आहे. सध्या रस्त्यांवर सांडपाणी वाहत असून नागरिकांना दुर्गंधी, रोगराई आणि दैनंदिन जीवनातील अडथळ्यांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, एका बाजूला इस्रायलच्या प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ल्यांमुळे शहरात विध्वंसाचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला इराणच्या राजधानीच्या रस्त्यांवर साचलेले गटारातील सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्ना गंभीर झाला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलीकडे झालेल्या इस्रायली हल्ल्यांमुळे केवळ सैन्य तळांनाच नुकसान झाले नाही. तर त्याचा परिणाम तेहरानच्या जमिनीखाली असलेल्या सांडपाणी आणि जलपुरवठा पाइपलाइन्सवरही आता झाला आहे.
इराणमध्येही स्फोट, तेल डेपोला आग
तेहरानमधील छायाचित्रांमध्ये रात्रीच्या आकाशात मोठा स्फोट झाल्याचे दिसून आले. ही आग इराणच्या तेल आणि वायू क्षेत्रावर इस्रायली हल्ल्यांमुळे लागली. याचा परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणि सरकारी कामकाजावर होण्याची शक्यता आहे. यासोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला धोकाही वाढला आहे. दरम्यान, आयडीएफचा सर्वात लांब पल्ल्याचा हल्ला एका व्हिडिओमध्ये इस्रायली सैन्याने फक्त एका तासात 20 इराणी ड्रोन पाडल्याचे दाखवण्यात आले आहे. यापूर्वी, इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) सांगितले होते की त्यांनी इराणमधील मशहाद विमानतळावर एका इराणी विमानाला लक्ष्य केले. हा हल्ला इस्रायलपासून सुमारे 2,300 किलोमीटर अंतरावर करण्यात आला. आयडीएफने म्हटले आहे की "ऑपरेशन रायझिंग लायन" अंतर्गत हा आतापर्यंतचा सर्वात लांब पल्ल्याचा हल्ला आहे. इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की हे हल्ले इराणच्या अणु आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांना नष्ट करण्यासाठी आहेत, सरकार बदलण्यासाठी नाहीत.
इस्त्रायल-इराणचे हल्ले प्रतिहल्ले
इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले आहेत. इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये एका रहिवासी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये 29 मुलांसह 60 जणांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या























