अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
इराणच्या बगदादमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड आणि कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी 3 जानेवारीला ठार झाला होता. या हल्ल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 30 जण जबाबदार असल्याचं इराणने म्हटलं आहे.
तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध इराणने अटक वॉरंट जारी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इतर डझनभर व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी इराणने इंटरपोलची मदत मागितली आहे. इराणच्या बगदादमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड आणि कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी 3 जानेवारीला ठार झाला होता. याप्रकरणी इराणने हे पाऊल उचललं आहे, अशी माहिती तेहरानमधील वकील अली अलकासीमर यांनी सोमवारी दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणमध्ये झालेल्या हल्ल्यामागे डोनाल्ड ट्रम्य यांच्यासह 30 जण असल्याचा आरोप अलकासीमर यांनी केला आहे. याच हल्ल्यात कासिम सुलेमानीचा मृत्यू झाला होता. वृत्तसंस्था आयएसएनच्या बातमीनुसार, अलकासीमर यांनी ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त कुणाचंही नाव उघड केलेलं नाही.
फ्रान्समधील लियोनमधील इंटरपोलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. याबाबत इंटरपोल काही भूमिका घेईल याची शक्यताही कमी आहे. कारण कोणत्याही राजकीय मुद्यामध्ये इंटरपोल हस्तक्षेप करु शकत नाही.
अमेरिका आणि इराणमधील तणावादरम्यान अमेरिकेने इराणवर ड्रोन हल्ला केला होता. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात असताना हा हल्ला झाला. यात सुलेमानीची मृत्यू झाला. यासह इराणच्या मोबलायझेशन फोर्सचा कमांडर अबू मेहती अल मुहंदीसही ठार झाला होता.
रिवोल्यूशनरी गार्ड फोर्स इराणच्या सैन्याचा भाग आहे. मात्र अमेरिकेने एप्रिल 2019 मध्ये रिवोल्यूशनरी गार्ड फोर्सला दहशतवादी संघटना घोषिते केलं होतं. सुलेमानी पश्चिम आशियात इराणी कारवायांमागचा सूत्रधार मानला जातो. त्यामुळेच अमेरिकेने त्याला लक्ष केल्याची चर्चा होती.
संबंधित बातम्या
- इराणचा अमेरिकन लष्करी तळांवर मोठा हल्ला, डझनहून अधिक क्षेपणास्र डागली
- वर्ल्ड वॉर 3 ट्विटरवर ट्रेंड, काय आहे कारण
- अमेरिकेचा पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला, सहा जणांचा मृत्यू
- डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस
America-Iran Conflict | अमेरिका-इराणच्या वादामागील अर्थकारण नेमकं काय आहे? कादंबरीकार दिपक करंजीकरांसोबत चर्चा