एक्स्प्लोर
डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणच्या एका संस्थेने ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास बक्षिस जाहीर केलं आहे.
![डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस iran has offered 80 million bounty for the the head of us president donald trump डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास इराणच्या संस्थेकडून 500 कोटींचे बक्षिस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/06145942/trump.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बगदाद : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराक देखील इरेला पेटलेला दिसत आहे. जनरल कासिम सुलेमानी याच्या अंत्यविधीनंतर आता इराणचे नागरिक अमेरिकेवर चिडले आहेत. यातूनच इराणच्या एका संस्थेने राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांचा शिरच्छेद करणाऱ्यास 80 मिलीयन अमेरिकी डॉलर म्हणजे 5.76 अब्ज रुपयांचं बक्षिस जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
ज्या संस्थेनं हे बक्षिस जाहीर केलं आहे, त्यांनी इराणच्या प्रत्येक नागरिकाने यासाठी एक डॉलर रुपये द्यावे, असं आवाहन केलं आहे. अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. इराणमधील 52 ठिकाणं टारगेट केली असून जर इराणने कासिम सुलेमानी याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर या क्षणात ही ठिकाण लक्ष्य केली जातील, असा इशारा डॉनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांचा ट्विटद्वारे इशारा -
डॉनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करुन इराणला इशारा दिला आहे, त्यात ते म्हणतात, "याला एक इशारा समजा, इराणने अमेरिकी नागरिक किंवा मालमत्तेवर हल्ला केला, तर, लक्षात ठेवा आम्ही इराणमधील 52 ठिकाणांना लक्ष्य करुन ठेवलं आहे, ज्यात काही अतिमहत्वाची तर, काही इराणची सांस्कृतिक ठिकाणं आहेत. ही ठिकाणं काही क्षणात लक्ष्य केली जातील".
अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला -
अमेरिका आणि इराण यांच्यात दिवसेंदिवस तणाव निर्माण होताना दिसत आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बगदादमधील अमेरिकी दुतावास आणि सैन्य ठिकाणांवर शनिवारी (4 जानेवारी)रात्री दोन क्षेपणास्त्राने हल्ला झाला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून बदला घेणार असल्याचं बोललं गेलं होतं. अजूनही या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची थिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात कासिम सुलेमानीचा मृत्यू -
अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला. या रॉकेट हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत चालला आहे.
संबंधित बातम्या -
इराणकडून बदला? अमेरिकी दूतावासासह हवाईतळावर हल्ला
अमेरिकेचा पुन्हा एकदा इराकवर हवाई हल्ला, सहा जणांचा मृत्यू
इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला; 8 जणांचा मृत्यू
Modi meets Donald Trump | नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, इराण, व्यापार, फाईव्ह जीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)