Iran : हिजाब विरोधी आंदोलन 80 शहरांमध्ये पसरलं, निदर्शनांमुळे आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू
Iran Mass Protests : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळीचं लोण 80 शहरांमध्ये पसरलं आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.
Iran Protest on Mahsa Amini Death : इराणमधील हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. आता हिजाब विरोधी चळवळीचं लोण 80 शहरांमध्ये पसरलं आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. देशभरात महिलांकडून निदर्शनं करण्यात येत आहे. महिलांकडून आता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आलं आहे. महिलांकडून हिजाब जाळत आणि के कापून सरकारचा निषेध करण्यात येत आहे.
अटकेतील महिलेच्या मृत्यूनंतर आंदोलनाला सुरुवात
इराणमध्ये हिजाब न घातल्यानं एका महिलेला अटक करण्यात आली होती. पोलिस अटकेत असताना या महिलेचा मृत्यू झाल्यानं महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या अटकेत असताना महसा अमिनीचा मृत्यू (Mahsa Amini Death) झाला. यानंतर इराणमधील महिलांनी हिजाब विरोधी भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली.
80 हून अधिक शहरांमध्ये निदर्शनं
इराणच्या 31 प्रांतातील 80 हून अधिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात येतं आहेत. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर जागोजागी निदर्शनं सुरु आहेत. यावेळी झालेल्या हिंसाचारात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात सुरक्षा दलासह सुमारे 41 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. 13 सप्टेंबर रोजी महसा अमिनी तिचा भाऊ आणि इतर नातेवाईकांसह तेहरान मेट्रो स्टेशनमधून बाहेर पडत असताना तिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत तिचा मृत्यू झाला.
न्यूज अँकरनं हिजाब घालणं टाळलं, राष्ट्रपतींचा मुलाखत देण्यास नकार
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांनी अँकरने हिजाब न घातल्यामुळे मुलाखत देणं टाळलं. इब्राहिम रईसी यांनी मुलाखत घेण्यासाठी अमेरिकन महिला न्यूज अँकरसमोर हिजाब घालण्याची अट घातली होती. पण महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला. त्यामुळे मुलाखतीसाठीची सर्व तयारी पूर्ण होऊनही इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखत देणं नाकारलं. न्यूज अँकर क्रिस्टीन एमनपोर (Christiane Amanpour) यांनी दावा केलाय की त्या इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची मुलाखत घेऊ शकल्या नाहीत कारण त्यांनी हिजाब घालण्याची अट पूर्ण केली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या