एक्स्प्लोर
1 जुलैपासून सौदी अरबमध्ये 'फॅमिली टॅक्स', 41 लाख भारतीय अडचणीत
रियाध (सौदी अरब): 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीमुळे संपूर्ण देश ढवळून निघालेला असताना तिकडे सौदी अरबमध्येही 1 जुलैपासूनच चक्क 'फॅमिली टॅक्स' लागू करण्यात आला आहे. भारतात वस्तू आणि सेवांवरील जीएसटी लागू करण्यात आलेला असताना सौदी अरबमध्ये यापुढे चक्क थेट माणसांवरच टॅक्स लावण्यात आला आहे.
सौदी अरबमध्ये काम करणारे भारतीय नागरिक आपल्या डिपेंडेंट्सला (कुटुंबातील अवलंबून असणारे सदस्य) पुन्हा भारतात पाठवण्याचा विचार करत आहेत. कारण की, सौदी अरबमध्ये इतर देशातील काम करणाऱ्या नागरिकांना 1 जुलैपासून नवा टॅक्स लागू करण्यात येणार आहे. 'डिपेंडेंट टॅक्स' असा हा नवा टॅक्स असून यामुळे तिथे काम करणाऱ्यांच्या खिशाला अधिक चाट बसणार आहे.
सौदी अरबमध्ये 1 जुलैपालून नवा टॅक्स लागू होणार आहे. ज्यामध्ये आपल्या एका डिपेंडेंटसाठी 100 रियाल (1700 रुपये) दर महिना द्यावे लागणार आहेत. हा टॅक्स लागू झाल्यानं तेथील 41 लाख भारतीयांची चिंता वाढली आहे. यामुळेच तेथील भारतीय आपल्यासोबत राहणाऱ्या आई, वडील, बायको, मुलं यांना पुन्हा भारतात पाठवण्याचा विचार करीत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं असून या वृत्तात तिथं स्थायिक असलेला भारतीय नागरिक मोहम्मद ताहिरनं सांगितलं की, 'या निर्णयामुळे अनेक कुटुंबीयांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. कारण की, डिपेंडेंट्सवर लावण्यात आलेला कर त्यांना भरणं अशक्य आहे. त्यामुळे आता अनेकांना एकट्यानं राहावं लागणार आहे.'
दरम्यान, या निर्णयानंतर अनेक भारतीयांनी आपल्या कुटुंबांना भारतात परत पाठवणं सुरु केलं आहे.
डिपेंडेंट ठेवण्यासाठी महिन्याला 5000 रियाल कमावणं आवश्यक:
सौदी अरबमध्ये त्याच व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्हिसा मिळतो ज्याची महिन्याची कमाई 5000 रियाल (जवळजवळ 86,000 रुपये) आहे.
उदा: जर एखादा भारतीय नागरिक आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत असेल तर त्याला दर महिन्याला 300 रियाल (5100 रुपये) कर द्यावा लागेल. म्हणजेच 3600 रियाल (जवळजवळ 62,000 रुपये) वर्षाला करापोटी त्याला भरावे लागतील.
2020 पर्यंत डिपेंडेंट्सवर लावण्यात आलेल्या टॅक्समध्ये वाढ होण्याची शक्यता:
सध्या लागू करण्यात आलेला टॅक्स दरवर्षी वाढणार आहे. 2020 पर्यंत प्रत्येक वर्षी यामध्ये 100 रियालनं वाढ होणार आहे. याचा अर्थ तिथं राहणाऱ्या डिपेंडेंटसाठी 2020 पर्यंत 400 रियाल (6800 रुपये) कर भरावा लागेल. तसंच या टॅक्सची रक्कम आगाऊ द्यावी लागणार आहे. म्हणजेच जी व्यक्ती आपल्या पत्नीसोबत राहत आहे त्याला या वर्षाचे 1200 रियाल (20,400 रुपये) अॅडव्हांसमध्येच भरावे लागतील.
काही कंपन्यांकडून नोकरदारांना दिलासा, भरणार डिपेंडेंट टॅक्स:
दरम्यान, तेथील काही कंपन्यांनी आपल्या नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काही कंपन्या नोकरदारांचा डिपेंडेंट टॅक्स भरणार आहे. पण तरीही अनेकांना हा कर स्वत:लाच भरावा लागेल. या टॅक्सबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं की, 'याबाबत आतापर्यंत काहीही सांगता येणार नाही.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement