(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Power Crisis : पाकिस्तानमध्ये वीज संकट; इंटरनेट होऊ शकतं बंद, टेलिकॉम ऑपरेटर्सचा इशारा
Pakistan Power Crisis : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इशारा दिला होता की, जुलै महिन्यात जनतेला लोडशेडींगचा सामना करावा लागू शकतो.
Pakistan Power Crisis : पाकिस्तानमधील (Pakistan) वीज संकटामुळे (Power Crisis) एकीकडे लोडशेडींगचं संकट असताना आता टेलिकॉम ऑपरेटर्सनी (Telecom Operators) मोबाइल (Mobile) आणि इंटरनेट सेवा (Internet Services) बंद करण्याचा इशारा दिला आहे. एएनआई (ANI) वृत्तसंस्थेनुसार, नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बोर्ड (NIBT) ने ट्विटरवर म्हटलं आहे की, 'पाकिस्तानमधील टेलिकॉम ऑपरेटर्सनी देशभरात दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे.'
यापूर्वी जिओ न्यूजनुसार, सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इशारा दिला होता की, जुलै महिन्यात पाकिस्तानच्या जनतेला लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. सरकारकडून वेगवेगळ्या देशांसोबत करार करण्याचा प्रयत्न सुरु आहे पण, अद्यापही पाकिस्तानला आवश्यक द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) पुरवठा मिळू शकलेला नाही.
एलएनजी खरेदीसाठी पाकिस्तानचे प्रयत्न
पाकिस्तानची मासिक इंधन तेलाची आयात जून महिन्यामध्ये चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. कारण पाकिस्तानला वीज निर्मितीसाठी LNG ची आवश्कता आहे. यामुळे एलएनजी खरेदीसाठी पाकिस्तानचा संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान सध्या मोठ्या वीज संकटाचा सामना करत आहे. जनतेला लोडशेडींगच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
पाकिस्तानचे सरकार ऊर्जा संवर्धनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारी कर्मचार्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. कराचीसह विविध शहरांतील कारखान्यांना शॉपिंग मॉल लवकर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांनी जनतेला ऊर्जा बचत करण्याचं आवाहन केलं आहे.
जुलैमध्ये महागाईचा दर दुप्पट
पाकिस्तामध्ये परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. पाकिस्तानमधील महागाईचा दर जुलैमध्ये दुप्पट झाला आहे, ही जवळपास सहा वर्षांतील सर्वात मोठी वाढ आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या