Right To Abortion : अमेरिकेच्या नव्या निर्णयानंतर गुगलचं मोठ पाऊल, गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!
Right To Abortion : गर्भपात क्लिनिक, कौटुंबिक हिंसाचार पीडितांसाठी असलेली शेल्टर्स अशा ठिकाणांना भेट देणाऱ्या व्यक्तीची लोकेशन हिस्ट्री गुगल डिलीट करेल.
Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील गर्भपाताचे संवैधानिक अधिकार (Right To Abortion) आता संपले आहे. आता अमेरिकेतील सर्व राज्ये गर्भपाताबाबत त्यांचे स्वतंत्र नियम बनवतील. याच अधर्तीवर आता गुगलने देखील मोठे पाऊल उचलले आहे. यात गर्भपात क्लिनिक, कौटुंबिक हिंसाचार पीडितांसाठी असलेली शेल्टर्स अशा ठिकाणांना भेट देणाऱ्या व्यक्तीची लोकेशन हिस्ट्री गुगल डिलीट करेल.
जर एखाद्या व्यक्तीने अशा ठिकाणाला भेट दिल्याचे गुगलला कळले तर, गुगल तत्काळ त्या व्यक्तीची ही लोकेशन हिस्ट्री हटवून टाकेल, असे गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष जेन फिट्झपॅट्रिक यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. येत्या काही आठवड्यात हे बदल करण्यात येतील.
‘या’ ठिकाणांची लोकेशन हिस्ट्रीही डिलीट करणार!
व्यसनमुक्ती उपचार केंद्र, फर्टीलिटी सेंटर्स आणि वेटलॉस सेंटर्स अर्थात वजन कमी करण्यास मदत करणारे क्लिनिक या ठिकाणची लोकेशन हिस्ट्री देखील गुगल डिलीट करणार आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने अमेरिकन महिलांचे गर्भपाताचे घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतल्याच्या एका आठवड्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात आहे.
आम्ही आमच्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेतो आणि सरकारच्या आदेशाचे पालनही करतो, असे गुगलने म्हटले आहे. अलीकडे अमेरिकेत गर्भपाताच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांना गर्भपाताचा अधिकार द्यायचा की, नाही यात धार्मिक घटकांचाही सहभाग आहे. रिपब्लिकन (कंझर्व्हेटिव्ह) आणि डेमोक्रॅट्स (लिबरल्स) यांच्यातही हा वादाचा मुद्दा आहे. हा वाद 1973 मध्ये सुप्रीम कोर्टात पोहोचला, जो रो विरुद्ध वेड केस म्हणून ओळखला जातो. निकाल देताना न्यायमूर्ती सॅम्युअल अलिटो म्हणाले की, संविधान गर्भपाताच्या अधिकाराची तरतूद करत नाही. न्यायालयाने सुमारे 50 वर्षे जुना ऐतिहासिक 1973 ‘रो व्ही वीड’ निर्णय रद्द केला.
‘रो व्ही वीड’ प्रकरण काय?
जेन रो उर्फ नॉर्मा मॅककॉर्वे ही 22 वर्षांची अविवाहित आणि बेरोजगार महिला होती. जी 1969 मध्ये तिसऱ्यांदा गर्भवती झाली. टेक्सासमध्ये गर्भपात बंदीसाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. गर्भपाताच्या संदर्भात तिच्या बाजूने निकाल येईपर्यंत तिने एका मुलीला जन्म दिला होता. हेन्री वीड हे डॅलस काउंटी, टेक्सासमधील सरकारी वकील होते ज्यांनी गर्भपाताच्या अधिकारांना विरोध केला होता. या कारणास्तव हे प्रकरण ‘रो व्हर्सेस वीड’ म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा :