एक्स्प्लोर

Russia Ukraine War : आधीच महागाई वाढलेल्या यूएसच्या अर्थव्यवस्थेवर युद्धाचा परिणाम होऊ शकतो का?

Russia Ukraine War : यूएसमध्ये आधीच महागाईचा भडका सूरू आहे. त्यातच आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई आणखी वाढू शकते. रशिया-युक्रेन युद्धाचा यूएसच्या अर्थव्यवस्थेवर विविध मार्गांनी परिणाम होऊ शकतो, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असेल्या युद्धाचा (RUSSIA UKRAINE CONFLICT) परिणाम यूएसच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. फेडरल रिझर्व्हच्या धोरणकर्त्यांनी गुरुवारी याबाबतचे संकेत दिले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा यूएसच्या अर्थव्यवस्थेवर विविध मार्गांनी परिणाम होऊ शकतो. यामध्ये इंधन दरवाढीसह इतर घरगुती वस्तूंचेही दर वाढू शकतात.  

यूएसमध्ये आधीच महागाईचा भडका वाढला आहे. त्यातच आता रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर गुरुवारी तेलाच्या किमतींममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2014 नंतर प्रथमच  कच्च्या तेलाचे तर 105 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. याबरोबरच यूएसमध्ये ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. यूएसमध्ये आधीच महागाईचा भडका सूरू आहे. त्यातच आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई आणखी वाढू शकते.  

तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवर स्थिर राहिल्या तर यूएसमध्ये घरात वापर होणारी ऊर्जा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरी  750 डॉलरने वाढू शकते. या दरवाढीमुळे तेथील नागरिकांकडे इतर वस्तू आणि सेवांवर खर्च करण्यासाठी कमी पैसे राहतील, असे EY-Parthenon चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ ग्रेगरी डॅको यांनी सांगितले. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे या वर्षी महागाई 0.6 टक्क्यांनी वाढू शकते, अशी माहिती डॅको  यांनी दिली. 
 
"यूएसमधील कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या उत्पन्नातील मोठी रक्कम गॅसोलीनकडे जाते. त्यामुळे महागाई वाढली तर ग्राहकांचा खर्च कमी होतो. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, " अशी माहिती रिचमंड फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष थॉमस बार्किन यांनी दिली. असे असले तरी रशिया आणि युक्रेन दोघांची यूएसमधील आयात आणि निर्यात फक्त 1 टक्के पेक्षा कमी आहे.  त्यामुळे रशिया आणि युक्रेन संघर्षाचा यूएसच्या व्यापाराला जास्त मोठा फटका बसणार नाही. यूएस हा युरोपियन मित्र राष्ट्रांना  नैसर्गिक वायूची निर्यात करतो. त्यामुळे  नैसर्गित वायूंच्या किंमती मर्यादित केल्या पाहिजेत, असे तज्ञ्ज्ञांचे मत आहे. 

कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी ठप्प आहे. त्यामुळे वाहनांपासून अन्नापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच आता रशिया-युक्रेनच्या संघर्षामुळे या महागाईत आणखी वाढ  होऊ शकते. रशिया आणि युक्रेन हे जगातील एक चतुर्थांश गव्हाची निर्यात करतात. शिवाय युक्रेन हा जगातील प्रमुख कॉर्न निर्यात करणारा देश आहे. पुढील काही महिन्यांत विकसित अर्थव्यवस्थांमध्ये 0.2 ते 0.4 टक्क्यांच्या दरम्यान चलनवाढ होऊ शकते, असे अर्थशास्त्रज्ञ्ज्ञांचे मत आहे. 

अर्थशास्त्रज्ञ मायकेल स्ट्रेन यांच्या मते, युरोपध्ये कोणतीही उलथापालथ झाली तरी त्याचा यूएसच्या व्यापार आणि परदेशी गुंतवणुकीवर अप्रत्यक्षपणे नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget