Russia Ukraine Conflict : युद्धाच्या पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये 137 जणांच्या मृत्यू, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ
Russia Ukraine Conflict : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 316 लोक जखमी झाले आहेत.
Russia Ukraine Conflict : युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 316 लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रशियन लोकांनी ताब्यात घेतलेल्या ओडेसा प्रदेशातील झमीनी बेटावरील सर्व सीमा रक्षकांचा समावेश आहे.
रशियन सैन्याचा चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा
रशियन सैन्याने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा रशियन सैन्याने ताबा घेतला तेव्हा चेर्नोबिल प्लांटमधील कर्मचार्यांना ओलिस ठेवण्यात आले होते. या हालचालींना अमेरिकेने चिंताजनक म्हटले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरे ताब्यात घेण्याचा आणि शेवटी अधिक अनुकूल सरकार स्थापन करण्याचा रशियाचा हेतू असू शकतो.
युक्रेनमधील 18 हजार भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न
युक्रेनमधील प्रत्येक शहरात तणावाची स्थिती झाली आहे. चारीबाजूने रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे युक्रेनमधील तब्बल 18 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. हवाई सीमा बंद असल्याने अन्य मार्गांची चाचपणी केली जात आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
- Russia-Ukraine: थोडा जरी आत्मसन्मान शिल्लक असेल तर इम्रान खाननी रशिया दौरा रद्द करावा: शशी थरूर
- Russia-Ukraine Crisis: रशियाचं वर्तन हे 'नाझी जर्मनी'सारखं; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोदिमर झेलन्स्की यांचा आरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha