एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Russia Ukraine War : जो बायडन यांचा संताप; रशियाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही पण 'नाटो (NATO) प्रदेशाच्या प्रत्येक इंचाच्या जमिनीचं रक्षण करण्यास अमेरीका कटिबद्ध आहे, असं सूचक वक्तव्य जो बायडन यांनी केलं आहे.

Russia Ukraine War : युक्रेनवरील हल्ल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचा निषेध केला. राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) म्हणाले, रशिया युक्रेनवर हल्ला करेल, असा आम्हाला पूर्वीपासून अंदाज होता. बायडन म्हणाले की, पुतिन हे आक्रमक आहेत, त्यांनी युद्धाचा मार्ग निवडला. मात्र या हल्ल्याचे परिणाम पुतिन आणि त्यांचा देश रशियाला भोगावे लागतील. बायडन म्हणाले की, जगातील बहुतांश देश रशियाच्या विरोधात आहेत. आम्ही रशियावर आणखी कडक निर्बंध लादणार आहोत. 

बायडन म्हणाले की, या युद्धाचा फटका अमेरिकेलाही बसू शकतो. युक्रेनमध्ये अडकलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 

युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नाही : बायडन 

युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. दरम्यान, बायडन म्हणाले की, युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही पण 'नाटो (NATO) प्रदेशाच्या प्रत्येक इंचाच्या जमिनीचं रक्षण करण्यास अमेरीका कटिबद्ध आहे. एवढंच नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचंही बायडन यांनी सांगितलं.

हा पूर्वनियोजित हल्ला : बायडन 

बायडन म्हणाले की, रशियन सैन्यानं चिथावणी न देता युक्रेनवर क्रूर हल्ला केला आहे. अनेक महिन्यांपासून हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

बायडन म्हणाले की, आम्ही G-7 देश मिळून रशियाला प्रत्युत्तर देऊ. VTB सह आणखी 4 रशियन बँकांवर निर्बंध लादले जातील. पुढे बोलताना ते म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलण्याचा माझा कोणताही विचार नाही. त्याला पूर्वीच्या सोव्हिएत युनियनची पुनर्स्थापना करायची आहे. मला वाटतं की, त्यांच्या महत्त्वाकांक्षा या क्षणी आपण जिथे आहोत, त्याच्या अगदी विरुद्ध आहेत.

बायडन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेकडून रशियावर निर्यात निर्बंधही लादण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या निर्बंधांचा मोठा फटका रशियाला बसेल, असंही बायडन म्हणाले. सोबतच रशियातील उद्योगपती आणि अब्जाधीशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आर्थिक कोंडी करणार असल्याचा सूचक इशाराही जो बायडन यांनी दिला आहे. त्यासोबतच बायडन यांनी तेलाचे भाव कमी करण्यासाठी अमेरीकेतील तेलाच्या राखीव बफरमधून तेल बाजारात देण्याचं सांगितलं आहे. रशियाला स्विफ्ट बँकिंग प्रणालीपासून वेगळं केलं. रशियाच्या आर्थिक नाड्या आवळल्या, या निर्णयामुळे काही दिवसांत रशियात परदेशी चलनाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget